हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी १८ चिमुकले मुंबईसाठी रवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:53 PM2020-01-14T15:53:21+5:302020-01-14T15:53:27+5:30

शस्त्रक्रियेसाठी या बालरुग्णांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय चौकातून रवाना करण्यात आले.

18 childs left for Mumbai for cardiac surgery! | हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी १८ चिमुकले मुंबईसाठी रवाना!

हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी १८ चिमुकले मुंबईसाठी रवाना!

Next

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयविकाराशी लढा देणाऱ्या १८ बालरुग्णांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रियेसाठी या बालरुग्णांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय चौकातून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.
‘आरबीएसके’ अंतर्गत दरवर्षी शेकडो बालकांची तपासणी करून, चिमुकल्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली जात आहे. या मोहिमेंतर्गत सर्वोपचार रुग्णालय येथे दीडशेपेक्षा जास्त बालकांची टू डी ईको तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करण्यात आली होती. तपासणीच्या वैद्यकीय अहवालानंतर यातील ३१ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात यातील १८ बालकांवर हृदयाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी या बालकांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मुंबईसाठी रवाना करण्यात आले. उर्वरित बालकांना शस्त्रक्रियेसाठी २१ जानेवारी रोजी मुंबईला पाठविण्यात येणार आहे. त्यांचा संपूर्ण खर्च प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. मधुकर राठोड, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकिशोर कांबळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शैक्षणिक सत्रात दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आढळणाºया विविध आजारांचे निदान केले जात असले, तरी हृदयविकार आणि डोळ्यांच्या तिरळेपणाच्या उपचारावर जास्त भर दिला जातो.

शेकडो कुटुंबीयांना मिळाला दिलासा!
यापूर्वी बालकांमध्ये हृदयविकार असल्याचे उशिरा निष्पन्न होत असल्याने त्यांना प्राण गमवावे लागत होते; परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांच्या या मोहिमेमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अशा रुग्णांचे निदान होण्यास मदत होत आहे. बालकांमध्ये आढणाºया अशा रुग्णांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने शेकडो कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

‘आरबीएसके’अंतर्गत दरवर्षी बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात हृदयविकार असल्याचे निदर्शनास येत आहे. या बालकांमध्ये आजाराचे निदान करून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यांतर्गत सोमवारी १८ बालकांना शस्त्रक्रियेसाठी मुंबईला पाठविण्यात आले.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: 18 childs left for Mumbai for cardiac surgery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला