1.23 lakh farmers in Akola district get pension of Rs 3000 per month! | अकोला जिल्ह्यात अल्पभूधारक १.२३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन!
अकोला जिल्ह्यात अल्पभूधारक १.२३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन!

- संतोष येलकर
अकोला : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभूधारक व सीमांत शेतकºयांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अल्पभूधारक १ लाख २३ हजार ८०४ शेतकºयांना प्रतिमाह ‘पेन्शन’चा लाभ मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची नोंदणी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना गत ९ आॅगस्टपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले राज्यातील सर्व अल्पभूधारक शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकºयांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी गाव पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये (सेतू) लाभार्थी शेतकºयांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकºयांना कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी या योजनेमध्ये पात्र असून, यासंदर्भात गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत शेतकºयांना माहिती देऊन, नोंदणीसाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना १६ आॅगस्ट रोजी पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून, योजनेंतर्गत जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांची नोंदणी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ लाख २३ हजार ८०४ अल्पभूधारक शेतकरी असून, प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत संबंधित पात्र लाभार्थी शेतकºयांना प्रतिमाह ३००० रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे.

जिल्ह्यात असे आहेत अल्पभूधारक शेतकरी!
तालुका                   शेतकरी

अकोला                  २०५७५
बार्शीटाकळी           १५४७५
अकोट                    २३८६७
तेल्हारा                  १९९३९
बाळापूर                  १७१११
पातूर                      १३४१९
मूर्तिजापूर               १३४१८
............................................
एकूण                       १२३८०४

लाभार्थी शेतकºयांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’!
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत गावनिहाय लाभार्थी शेतकºयांच्या नोंदणीसाठी शिबिरे (कॅम्प) तसेच लाभार्थी शेतकºयांना पेन्शन कार्ड वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देशही राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांना ‘पेन्शन कार्ड’ मिळणार आहेत.

शेतकºयांना भरावा लागणार विमा हप्ता!
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत लाभार्थी शेतकºयांच्या नोंदणीनंतर संबंधित शेतकºयांना लाभार्थी हिस्सा रकमेपोटी वयानुसार कमीत कमी ५० रुपये व जास्तीत जास्त २०० रुपये विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करावी लागणार आहे. शेतकºयांना भराव्या लागणाºया विमा हप्त्याच्या रकमेत ५० टक्के रक्कम शासनामार्फत भरण्यात येणार आहे आणि वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकºयांना प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत अल्पभूधारक लाभार्थी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्याच्या सूचना तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांच्या संचालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांची बैठक १९ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
-विजय लोखंडे,
तहसीलदार, अकोला.

 

Web Title: 1.23 lakh farmers in Akola district get pension of Rs 3000 per month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.