कुंभारकला वाचविण्यासाठी तरुणाची धडपड; नोकरीऐवजी घडवतोय मातीची मडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:06 PM2020-01-13T13:06:29+5:302020-01-13T13:07:02+5:30

पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील एक पदवीधर तरुण कुंभारकला वाचविण्यासाठी धडपडत आहे. तो नोकरी करण्याऐवजी पारंपरिक मातीची मडकी बनविण्याचा व्यवसाय करत आहे.

Young girl's struggle to save Kumbhakara; Instead of a job, you are making a clay | कुंभारकला वाचविण्यासाठी तरुणाची धडपड; नोकरीऐवजी घडवतोय मातीची मडकी

कुंभारकला वाचविण्यासाठी तरुणाची धडपड; नोकरीऐवजी घडवतोय मातीची मडकी

Next

खासेराव साबळे ।  
पिंपळगाव माळवी : पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील एक पदवीधर तरुण कुंभारकला वाचविण्यासाठी धडपडत आहे. तो नोकरी करण्याऐवजी पारंपरिक मातीची मडकी बनविण्याचा व्यवसाय करत आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये विविध सण, समारंभावेळी मातीपासून बनविलेल्या विविध वस्तूंना मोठे महत्त्व आहे. त्या वस्तू पारंपरिक पद्धतीने बनविण्यात कुंभार समाजाचे मोठे योगदान आहे. सध्या या समाजातील तरुण पिढी या व्यवसायापासून दुरावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ही कला लोप पावत चालली आहे. परंतु, पिंपळगाव माळवी येथील कुंभार समाजातील पदवीधर तरुण राजू काशिनाथ काळे याने नोकरी न करता ही पारंपरिक कला जोपासण्याचा चंग बांधला आहे. राजूला त्याचे वडील काशीनाथ दगडू काळे (वय ८५) यांनी  स्वत: या कलेत पारंगत केले आहे व विविध वस्तू बनविण्याचे धडे दिले आहेत.
सध्या राजू मकरसंक्रांत सणासाठी लागणारे सुगडे तयार करण्यात व्यस्त आहे. हा तरूण दीपावली, मकरसंक्रांत, अक्षयतृतीया , उन्हाळ्यातील पाण्याचे माठ, झाडांच्या कुंड्या, पणत्या, गणेश मूर्ती तयार करणारा पिंपळगाव पंचक्रोशीतील एकमेव कारागीर आहे. या मातीच्या वस्तू भाजण्यासाठी ‘आवा लावणे’ ही कलाही तो शिकला आहे. कुंड्या तयार करण्यात त्याने विशेष कौशल्य हस्तगत केले आहे.
या व्यवसायास लागणारी माती, जळन, घोड्याची लिद उपलब्ध होत नाही. परंतु, त्यासाठी बरीच भटकंती करून या वस्तू जमा करव्या लागतात, असे त्यांनी सांगितले. या व्यवसायामध्ये त्याला पत्नीची मदत मिळते. यातूनच तो या व्यवसायातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह व दोन मुलांचे शिक्षण करत आहे. 
ग्रामीण भागामध्ये हा पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मी जाणीवपूर्वक या व्यवसायामध्ये पूर्णवेळ उतरलो. या व्यवसायातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, असे राजू काळे याने सांगितले.

Web Title: Young girl's struggle to save Kumbhakara; Instead of a job, you are making a clay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.