You do not have the permission required to post | उपचारांसाठी वणवण फिरावे लागणार नाही

उपचारांसाठी वणवण फिरावे लागणार नाही

अहमदनगर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज आहे. त्यादृष्टिने प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे. नगर शहरात अजूनही विनामास्क लोकांची संख्या आढळून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. संभाव्य रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचारासाठी कोणालाही वणवण फिरण्याची वेळ येणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी विभागीय आयुक्त गमे आणि राज्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, भिंगार कंटेन्मेंट बोर्डाचे मु्ख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील, उदय किसवे, डॉ. अजित थोरबोले, जयश्री माळी, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, उज्ज्वला गाडेकर, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड, आदींची यावेळी उपस्थिती होती.

आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतल्यानंतर गमे म्हणाले, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन बेडस् आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देऊन नियोजन करावे. महानगरपालिका, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त असल्याचे दिसत आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी सध्या रुग्णवाढीचा वेग कमी दिसत असला तरी आगामी काळात तो वाढणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे. रुग्णवाढीचा वेग जास्त असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करून बाधित व्यक्तींना तत्काळ उपचार उपलब्ध करून देणे. त्यांना इतरांपासून अलग करणे आणि संसर्गाची साखळी तुटेल या पद्धतीने आता कार्यवाही आवश्यक आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, साखर कारखाने, विविध उद्योग, मोठ्या संस्था, बँका, पतसंस्था, आदींचे त्यासाठी सहकार्य घेता येईल, असे गमे म्हणाले. कंटेन्मेंट झोन जाहीर केल्यानंतर तेथे कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, खासगी रुग्णालयात विनाकारण ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर बेडस् रुग्णांनी अडविल्या गेल्या नाहीत ना हे तपासण्याची सूचना त्यांनी केली. उपचार आवश्यक असलेल्या व्यक्तींना ते मिळण्याची गरज आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला गरज नसेल तर ‘स्टेप डाऊन’ याप्रमाणे त्याला कोविड केअर सेंटर अथवा इतरत्र शिफ्ट करून दुसऱ्या रुग्णाला ते बेडस उपलब्ध करून दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोविड संदर्भातील सर्व माहिती पोर्टलवर वेळेवर अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

---

फोटो- ०७ राधाकृष्ण गमे

नगर शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ. सुधाकर शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी तेथील नागरिकांशी संवाद साधला.

Web Title: You do not have the permission required to post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.