wrong take the rights, Information Commissioner : Anna Hazare | माहिती आयुक्तांचे अधिकार केंद्राच्या हातात घेणे चुकीचे : अण्णा हजारे
माहिती आयुक्तांचे अधिकार केंद्राच्या हातात घेणे चुकीचे : अण्णा हजारे

पारनेर : केंद्रीय माहिती अधिकारात करण्यात आलेल्या बदलामुळे जनतेचे अधिकार कमी होण्याचे धोका दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी येथील पत्रकार परिषदेत अण्णा हजारे बोलत होते.
अण्णा हजारे म्हणाले, मोदी सरकारने दोन दिवसांपूर्वी लोकसभेत माहिती अधिकार कायद्याच्या दुरुस्तीसाठी विधेयक मंजूर करून घेतले. 2006 मध्येच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आपण आंदोलन केले. नंतर तत्कालीन पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर माहिती अधिकार कायदा पूर्ववत करण्यात आला होता. माहिती आयुक्तांचे अधिकार या कायद्यामुळे कमी होणार असल्याचेही हजारे म्हणाले.

 


Web Title: wrong take the rights, Information Commissioner : Anna Hazare
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.