शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जनतेची सेवा करू - शालिनी विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:00 PM2018-02-27T18:00:43+5:302018-02-27T18:00:43+5:30

सुजय विखे डॉक्टर आहे. सामाजिक प्रश्नांची नाडी ओळखून तो सर्व समस्या दूर करील. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यत आम्ही जनतेची सेवा करू, असा शब्द मी आज कर्जतकरांना देत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी दिली.

We will serve the people till the last breath - Shalini Siddhi | शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जनतेची सेवा करू - शालिनी विखे

शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जनतेची सेवा करू - शालिनी विखे

Next

कर्जत : सुजय विखे डॉक्टर आहे. सामाजिक प्रश्नांची नाडी ओळखून तो सर्व समस्या दूर करील. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यत आम्ही जनतेची सेवा करू, असा शब्द मी आज कर्जतकरांना देत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी कर्जत महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलताना दिली.
कर्जत येथील गोदड महाराज क्रीडा नगरीत जनसेवा फौडेंशन, पंचायत समिती कर्जत व महिला विकास महामंडळ, कर्जत तालुका कृषीविभाग यांच्या वतीने २४ ते २६ फेब्रवारी असे तीन दिवस लेक वाचवा आभियान अंतर्गत सक्षम महिला कर्जत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याची सांगता मंगळवारी झाली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ सुजय विखे यांनी केले होते. याप्रसंगी डॉ.सुजय विखे, सुनंदा पिसाळ, योगिता सोनमाळी, पूजा मेहत्रे, मोनाली तोटे, मिर्झा बेग, अंबादास पिसाळ, प्रविण घुले, दादासाहेब सोनमाळी, कैलास शेवाळे, सचिन घुले, हर्षल शेवाळे, डॉ संदीप काळदाते, राजकुमार आंधळकर, बापूराव गायकवाड, रामचंद्र गांगर्डे, बाळासाहेब सपकाळ, चंदन भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विखे पुढे म्हणाल्या, पद्मश्री विखे पाटील यांनी विखे परिवार हा गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, युवती यांच्यासह सर्व समाजाच्या सर्व जातीधर्माच्या नागरिकांची सेवा करणे, त्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्याचा वारसा घालून दिला आहे. हाच वारसा डॉ.सुजय विखे हे पुढे चालवीत आहेत. साई ज्योती महिला बचत गटाने महिलांना सक्षम करणाची चळवळ सुरू केली. आज जिल्ह्यात हजारो बचत गट निर्माण झाले असून ते महिलांना पायावर उभा करीत आहेत. ग्रामीण भागातील महिला पण कर्तबगार आहेत. त्यांना संधी मिळण्याची गरज आहे. तीन दिवसाच्या मोहत्सवास जनतेने प्रंचड प्रतिसाद दिला आहे. आम्ही विखे कुटुंब कर्जतच्या जनतेचे ऋण कधीच विसरणार नाही,असे त्या म्हणाल्या.
डॉ. सुजय विखे म्हणाले, तीन दिवस चाललेल्या या महोत्सवास किमान ५० हजार नागरिक, महिला, युवक आणि युवती यांनी भेट दिली आहे. कार्यक्रम यशस्वी होवू नये म्हणून काही जणांनी छुपा विरोधही केला, मात्र येथे आलेल्या सर्व माता आणि भगिनी यांनी चांगले काम करणाºयाच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत हे या विरोध करणाराना दाखवून दिले आहे.

कर्जतकरांनी केला मायलेकरांचा नागरी सत्कार

कर्जतसारख्या दुष्काळी आणि जिल्ह्यातील दुर्लक्षीत तालुक्यामध्ये येवून येथे महिलांसाठी कार्यक्रम घेतला. बचतगट, महिला व युवक, युवती यांना एक व्यासपीठ दिले. याबद्दल कर्जत तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे व डॉ. सुजय विखे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

Web Title: We will serve the people till the last breath - Shalini Siddhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.