जागरूक मंचकडून आरोग्य केंद्रांमध्ये पाण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:26 AM2021-04-30T04:26:45+5:302021-04-30T04:26:45+5:30

केडगाव : केडगाव जागरूक नागरिक मंचने केडगाव नागरी आरोग्य केंद्र, महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, तोफखाना नागरी आरोग्य केंद्र ...

Water management in health centers from Awareness Forum | जागरूक मंचकडून आरोग्य केंद्रांमध्ये पाण्याची व्यवस्था

जागरूक मंचकडून आरोग्य केंद्रांमध्ये पाण्याची व्यवस्था

googlenewsNext

केडगाव : केडगाव जागरूक नागरिक मंचने केडगाव नागरी आरोग्य केंद्र, महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, तोफखाना नागरी आरोग्य केंद्र तसेच भाळवणी येथील कोविड केअर सेंटर, शासकीय रुग्णालय येथे महिनाभरापासून पाण्याची मदत सुरू ठेवली आहे. रणरणत्या उन्हात कोविड लसीकरणासाठी तसेच आरोग्य केंद्रावर कोरोना चाचणी करणाऱ्या, कोविड केअर सेंटर येथे दाखल असलेल्या रुग्णांची तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाण्याची सोय शुद्ध पाण्याच्या बाटल्या पुरवून त्या ठिकाणी मंच मदत करत आहे. शुक्रवारपासून कोविड केअर सेंटर येथे मंचातर्फे अन्नदान सुरू होणार आहे. मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी केले आहे. प्रवीण पाटसकर, गणेश पाडळे, अनुरिता झगडे, युवराज शिंदे, जनार्दन भोजने, सद्दाम शेख, किशोर पाटील, जनार्दन शेलार, जालिंदर शिंदे आदी नियोजन करत आहेत.

Web Title: Water management in health centers from Awareness Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.