घराची भिंत कोसळून महिला ठार; एक जखमी, साकूर परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:41 PM2020-03-30T12:41:06+5:302020-03-30T12:42:43+5:30

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर परिसरात  शनिवारी (दि.२८ मार्च) सायंकाळी   वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून एक महिला ठार झाली. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Wall collapses; woman kills; One injured, incident in Sakura area | घराची भिंत कोसळून महिला ठार; एक जखमी, साकूर परिसरातील घटना

घराची भिंत कोसळून महिला ठार; एक जखमी, साकूर परिसरातील घटना

Next

आश्वी : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर परिसरात  शनिवारी (दि.२८ मार्च) सायंकाळी   वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून एक महिला ठार झाली. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.      
शनिवारी रात्री साडेसात  वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठारावरील साकुर  परिसरात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या जोरदार वाºयासह झालेल्या पावसाने बिरेवाडी येथील सावित्रा खेमनर यांच्या राहात्या घराची भिंत अंगावर पडून दगडाबाई सावित्रा खेमनर यांचे निधन झाले. तर मुलगा  बाळू सावित्रा खेमनर हे गंभीर जखमी झाले.  यावेळी झालेल्या पावसाने कांदा, टोमॅटो, गहू, हरभरा, टरबूज पिकांचे मोठे नुकसान केले आहे.  वादळात येथील मोठ मोठी झाडे वीज वाहक खांब व ट्रासफार्मर उन्मळून पडले आहेत.
 

Web Title: Wall collapses; woman kills; One injured, incident in Sakura area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.