नगरमधील भिंगार उपनगर १०० टक्के लॉकडाऊन;  पोलिसांकडून  कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 12:04 PM2020-04-05T12:04:16+5:302020-04-05T12:05:02+5:30

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नगर शहरातील भिंगार उपनगरात गेल्या दोन दिवसापासून पोलिसांनी १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. 

Vanguard suburb of town with a lockdown of 5 percent; Strict action by the police | नगरमधील भिंगार उपनगर १०० टक्के लॉकडाऊन;  पोलिसांकडून  कडक कारवाई

नगरमधील भिंगार उपनगर १०० टक्के लॉकडाऊन;  पोलिसांकडून  कडक कारवाई

Next

भिंगार : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नगर शहरातील भिंगार उपनगरात गेल्या दोन दिवसापासून पोलिसांनी १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. 
नगर शहर व परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने त्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये प्रत्येक गल्लीत व कॉलनीच्या सीमा बांबू लावून  बंद करण्यात आल्या आहेत. मोमिन गल्ली, गवळीवाडा, भीमनगर, सरपण गल्ली इत्यादी ठिकाणी छावणी परिषदेने बांबू लावून या गल्ली व कॉलनीची सीमा बंद केल्या आहेत. परराज्यात किंवा दुसºया गावावरून आलेल्या व्यक्तींना भिंगारमध्ये येण्यास सक्त मनाई केलेली आहे. विनाकारण फिरणाºया लोकांना सुद्धा यामुळे गल्ली किंवा कॉलनीच्या बाहेर पडता सुद्धा येणार नाही. या हेतूने छावणी परिषद सीमा बंद केले आहे. जे विनाकारण फिरत आहेत. त्यांना पोलीस सक्त ताकीद देत आहेत. तसेच वाहनांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. भाजीपाला विक्री व मेडिकल दुकाने सोशल डिस्टन्स ठेवून सुरु आहेत. पोलिसांच्या आवाहनाला भिंगारकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी नागरिकांनी घरात बसून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. 
 

Web Title: Vanguard suburb of town with a lockdown of 5 percent; Strict action by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.