लसीकरणाचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:22 AM2021-05-07T04:22:42+5:302021-05-07T04:22:42+5:30

नगरसेविका गाडे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या या लसीकरण केंद्रावर कुठल्याही ...

Vaccination planning collapsed | लसीकरणाचे नियोजन कोलमडले

लसीकरणाचे नियोजन कोलमडले

Next

नगरसेविका गाडे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या या लसीकरण केंद्रावर कुठल्याही प्रकारे नियोजन नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लस घेण्यासाठी नागरिकांना दिवसभर ताटकळत उभे राहावे लागते. तास न्‌ तास नागरिक केंद्रावर उभे असतात. महापालिकेने आरोग्य केंद्रावर डॉक्टरांचे नंबर दिले आहेत. परंतु हे नंबर बंद असल्यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागते. नागरिकांचा संपर्क होत नाही. लसीकरण केंद्रावर असलेल्या संबंधित डॉक्टर व अधिकारी यांना फोन चालू ठेवण्याचे आदेश द्यावे. आरोग्य केंद्रात नागरिक लसीकरणासाठी भल्या पहाटेपासूनच रांगा लावून गर्दी करीत आहेत. लसीसंदर्भात माहिती देण्यासाठी केंद्रावर मनपाचा आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नसतो. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवर रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी, अशी मागणी गाडे यांनी केली आहे.

Web Title: Vaccination planning collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.