जामखेड तालुक्यात परवानगी नसणारे अनाधिकृत दवाखाने बंद करणार-प्रांताधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:14 PM2020-09-16T12:14:48+5:302020-09-16T12:15:21+5:30

जामखेड - केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शना नुसार लॉकडाऊन करता येणार आहे. जनता कर्फ्यू ठेवायचा असेल तर जनतेला अत्यावश्यक सेवा पुरवण्याची जबाबदारी कोण करणार ? यावर फक्त जास्तीत जास्त अँटिजेन टेस्ट करणे व सुरक्षितता बाळगणे एवढाच पर्याय आहे. जास्तीत जास्त आँक्सीजन बेड सुविधा उपलब्ध करणा-यावर शासनाचा भर राहणार आहे. तसेच अनधिकृतपणे चालू असणाऱ्या कोवीड सेंटर बंद करण्यात येईल असे स्पष्टीकरण प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.

Unauthorized clinics closed without permission | जामखेड तालुक्यात परवानगी नसणारे अनाधिकृत दवाखाने बंद करणार-प्रांताधिकारी

जामखेड तालुक्यात परवानगी नसणारे अनाधिकृत दवाखाने बंद करणार-प्रांताधिकारी

Next

शासनाच्या मार्गदर्शनानुसार लॉकडाऊन नाही - प्रांत अर्चना नष्टे

जामखेड - केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शना नुसार लॉकडाऊन करता येणार आहे. जनता कर्फ्यू ठेवायचा असेल तर जनतेला अत्यावश्यक सेवा पुरवण्याची जबाबदारी कोण करणार ? यावर फक्त जास्तीत जास्त अँटिजेन टेस्ट करणे व सुरक्षितता बाळगणे एवढाच पर्याय आहे. जास्तीत जास्त आँक्सीजन बेड सुविधा उपलब्ध करणा-यावर शासनाचा भर राहणार आहे. तसेच अनधिकृतपणे चालू असणाऱ्या कोवीड सेंटर बंद करण्यात येईल असे स्पष्टीकरण प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.

       शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता तहसील कार्यालयात लॉकडाऊन करण्यासंदर्भात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, नगराध्यक्ष निखिल घायतडक, प्रा. मधुकर राळेभात, अँड. अरूण जाधव, मंगेश आजबे, पांडुरंग भोसले, विठ्ठलराव राऊत, पवनराजे राळेभात, प्रदीप टापरे, राहुल उगले, संजय कोठारी, प्रविण बोलभट आदी उपस्थित होते. 

  यावेळी लॉकडाऊन संबधी अनेकांनी लॉकडाऊन कडक करावा. शासनाने राज्य राखीव पोलीस दल आणून नियंत्रण ठेवावे तसेच दहा दिवस जनता कर्फ्यू ठेवला तर कोणी उपाशी राहत नाही अशी भूमिका मांडली. यावेळी प्रांताधिकारी यांनी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याबाबत मार्गदर्शन दिले आहे त्यानुसार लॉकडाऊन करता येत नाही. सध्या जास्तीत जास्त बेड उपलब्ध करून देणे व अँटिजेन टेस्ट करणे एवढेच पर्याय आह

यावेळी महिला व नागरीकांनी खाडेनगर,  महाराष्ट्र बॅंकेशेजारी होत असलेले सेंटर, तसेच नगररोड येथे असलेल्या कोवीड सेंटरला परवानगी नाही याची पाहणी करून वर्दळीच्या ठिकाणी कोवीड सेंटर नकोच अशी मागणी केली सदर जागेची पाहणी करावी अशी मागणी केली. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी परवाना नसणारे कोवीड सेंटर बंद करण्यात येईल. यानंतर रात्री उशिरा प्रांताधिकारी यांनी कोविड सेंटरची तपासणी करून सदर दवाखाना चालकांची कानउघाडणी केली असल्याचे समजते. 

---

नगर रस्त्यावर अनाधिकृत कोवीड सेंटर चालू आहे दोन दिवसापूर्वी तेथील दवाखान्यातून एक कोवीड रूग्ण पळून जाण्यापूर्वी अर्धा तास रस्त्यावर फिरत होता परंतु प्रशासनाने दवाखान्यानी दखल घेतली नाही तसेच सदर कोवीड सेंटर मधून मोठ्या प्रमाणावर रूग्णांचे बिल काढले जात आहे. तसेच बीड रस्त्यावर असलेल्या दोन कोवीड सेंटरच्या बिलाबाबत तक्रारी आहेत या सर्व सेंटरवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Unauthorized clinics closed without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.