उक्कडगावला मिळाला स्मार्ट ग्राम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:09 PM2020-01-26T18:09:41+5:302020-01-26T18:10:16+5:30

मुंजोबा मंदिराजवळ एक उद्यान विकसीत करण्यात आले आहे. 

Ukkadgaon received the Smart Village Award | उक्कडगावला मिळाला स्मार्ट ग्राम पुरस्कार

उक्कडगावला मिळाला स्मार्ट ग्राम पुरस्कार

Next

श्रीगोंदा-श्रीगोंदा तालुक्यातील शिरुर रोडवरील सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या उक्कडगव ग्रामपंयतीने ग्राम स्वच्छता शाळांची सुधारणा आणि पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ सिस्टीम बसवली रस्ते भुयारी गटार कामे केली आहेत त्यामुळे उक्कडगाव स्मार्ट व्हिलेज झाले आहे. 

पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते स्मार्ट व्हिलेज म्हणून उक्कडगावचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सरपंच रेखा पवार उपसंरपच हेमलता लगड ग्रामसेवक संदीप लगड यांनी स्विकारला. 

14वा वित्त आयोग निधीतीतून आर ओ प्रणालीसाठी साधे पाणी व थंड पाण्याचा प्रकल्प उभा करण्यात आला. तसेच आता ऑनलाईन पध्दतीने सुविधा दिल्या जात आहेत. ग्रामपंचयत मालकीची  पिठाची गिरणी सुरू करून अल्प दरात दळण दिले जाते. तसेच व्यक्तीगत व सार्वजनिक शौचालये करून 100% वापर केला जातो. मुलं मुली प्रमाण यात उक्कडगाव येथे मुलींचा जन्म दर रेषो अधिक आहे. शाळा व अंगणवाडीत चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि दलित सुधार योजनेतून रस्ते गटारची कामे करण्यात आली आहेत. तसेच मुंजोबा मंदिराजवळ एक उद्यान विकसीत करण्यात आले आहे. 

उक्कडगावला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला यामध्ये ग्रामस्थांचे  सहकार्य लाखमोलाचे ठरले आहे गावात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. 

- रेखा पवार सरपंच, हेमलता लगड उपसरपंच 

Web Title: Ukkadgaon received the Smart Village Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.