जामखेड तालुक्यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 01:20 PM2019-12-15T13:20:22+5:302019-12-15T13:20:47+5:30

जामखेड तालुक्यातील शिऊर फाटा व तेलंगशी या ठिकाणी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.

Two persons drowned in water in Jamkhed taluka | जामखेड तालुक्यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

जामखेड तालुक्यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

googlenewsNext

जामखेड : तालुक्यातील शिऊर फाटा व तेलंगशी या ठिकाणी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली.
बाळू उर्फ प्रकाश श्रावण तुपे (रा. बीड), प्रणीता गंगाधर ढाळे (रा. तेलंगशी, ता. जामखेड) अशी मृतांची नावे आहेत. बाळूचा मृतेदह शिऊर फाटा येथील विहिरीत तर प्रणीता या अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीचा तेलंगशीतील विहिरीत मृतदेह आढळून आला.
बाळू तुपे हा महिनाभरापासून शिऊर फाटा येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. दि.७ डिसेंबरपासून तो बेपत्ता होता. ११ डिसेंबरला त्याचा मृतदेह शिऊर फाटा येथील हॉटेलच्या मागील विहिरीमध्ये पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच नातेवाईक रुग्णालयत दाखल झाले. घरात भांडणे झाल्याने बाळू हॉटेलात वेटरचे काम करत होता. त्याच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांना संशय असल्याने पोलिसांनी त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.
दुसरी घटना तेलंगशी येथे घडली. शुक्रवारी (दि. १३) रात्री तेलंगशी येथील अर्जुन बाबू जावळे यांच्या शेतातील विहिरीत प्रणीता गंगाधर ढाळे या अकरावीतील तरुणीचा मृतदेह आढळला. दुपारी शेळ्या चारण्यासाठी ती शेतात गेली होती. तिचा विहिरीतील पाण्यात पडून मृत्यू झाला. 

Web Title: Two persons drowned in water in Jamkhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.