दोन गुटखाकिंग गजाआड; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:48 PM2020-12-04T13:48:53+5:302020-12-04T13:49:30+5:30

 श्रीगोंदा पोलिसांनी काष्टी येथील जाणता राजा व शिवकृपा पानसेंटर छापा टाकून सुमारे आठ लाखाचा गुटखा व एक मारुती कार जप्त केली आहे. त्यामुळे काष्टी अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी केली आहे. 

Two gutkhaking gajaads; Eight lakh items confiscated | दोन गुटखाकिंग गजाआड; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त 

दोन गुटखाकिंग गजाआड; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त 

googlenewsNext

काष्टी : श्रीगोंदा पोलिसांनी काष्टी येथील जाणता राजा व शिवकृपा पानसेंटर छापा टाकून दोन जणांना अटक केली आहे. यात सुमारे आठ लाखाचा गुटखा व एक मारुती कार जप्त केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही कारवाई केली आहे. 

   पोलिसांनी काष्टीतील गुटखाकिंग सचीन पांडुरंग कोकाटे व दिपक नाना टकले याना बेड्या ठोकल्या आहेत. अधिक माहिती अशी की, काष्टीतील पानटपऱ्या गुटखा असल्याची खबर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली.  गुरुवारी संध्याकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉस्टेबल किरण बोराडे, प्रताप देवकाते, अमोल  आजबे, कुलदीप घोळवे, किरण भापकर, संतोष कोपनर, गोकुळ इंगवले यांनी दोन टपऱ्यावर छापे टाकले. सुमारे तीन लाखांचा गुटखा व पाच लाखाची मारुती कार जप्त केली आहे. 

Web Title: Two gutkhaking gajaads; Eight lakh items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.