मजलेशहर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:47+5:302021-03-08T04:21:47+5:30

शेवगाव : तालुक्यातील मजलेशहर येथे शनिवारी रात्री बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्यांना ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर ...

Two goats killed in leopard attack at Majleshahar | मजलेशहर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

मजलेशहर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

Next

शेवगाव : तालुक्यातील मजलेशहर येथे शनिवारी रात्री बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्यांना ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या वर्षअखेरीस परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. या परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले होते. मात्र, शनिवारी नागरिकांना मजलेशहर परिसरातील वडुले रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिले. त्याच रात्री दादासाहेब गोविंद म्हसरूप यांच्या दोन शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने त्यांना ठार केले. त्यानंतर, परिसरातील गावांत बिबट्याची दहशत पसरली आहे. या घटनेला सहायक वनसंरक्षक सुनील पाटील यांनीही दुजोरा दिला असून मजलेशहर व परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.

ऊसतोडणीचा हंगाम सुरू असून वाडी-वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Two goats killed in leopard attack at Majleshahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.