दोन पिढ्या गुहेत राहणा-यांना मिळाले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:18 PM2019-10-27T12:18:16+5:302019-10-27T12:18:53+5:30

अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी फोपसंडी गावातील सोमनाथ घामाजी वळे यांनी चक्क दुसºया पिढीत घर पाहिले. गेल्या दोन पिढ्या वळे कुटुंब डोंगर कपारीत असलेल्या गुहेत आपले जीवन जगत होते. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घर देण्यात आले असून नव्या घरात त्यांची दिवाळी साजरी होणार आहे.

Two generations lived in the caves | दोन पिढ्या गुहेत राहणा-यांना मिळाले घर

दोन पिढ्या गुहेत राहणा-यांना मिळाले घर

googlenewsNext

मच्छिंद्र देशमुख । 
अकोले : अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी फोपसंडी गावातील सोमनाथ घामाजी वळे यांनी चक्क दुस-या पिढीत घर पाहिले. गेल्या दोन पिढ्या वळे कुटुंब डोंगर कपारीत असलेल्या गुहेत आपले जीवन जगत होते. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घर देण्यात आले असून नव्या घरात त्यांची दिवाळी साजरी होणार आहे.
घर देता का कुणी घर?  ही म्हण कधी कधी प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळते. अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी फोपसंडी या गावात सोमनाथ घमाजी वळे (वय ६०) हे गावाच्या उत्तरेला सहाशे फूट उंच डोंगरावर एका गुहेत राहतात. त्यांचे वडील व आजोबा देखील याच गुहेत राहत होते. गायी पाळणे, कंदमुळे व जंगलातील मध, डिंक, वनौषधी विकून हे कुटुंब जगत आहे. 
ब्रिटिशकाळात जंगल कायदा आला व अभयारण्य क्षेत्रात हे गाव आले. वळे कुटुंब ज्या गुहेत राहत होते, गुरे चारत होते ते जंगल अभयारण्यात गेले. त्यामुळे त्यांच्या नावावर जमीन होऊ शकली नाही. त्यामुळे घर बांधायला जागाच राहिली नाही. केवळ अभयारण्यात गायी चारायच्या. वनसंपदेतील घटक विकून पोट भरायचे, एवढेच काम, शिक्षण, वीज, घर, टिव्ही या त्यांच्या स्वप्नांतीलच गोष्टी.  घर काय असते हे त्यांनी कधी पाहिलेच नाही. 
सरकारी घर मिळाल्याचा आनंद
आम्ही दोन पिढ्या गडदीत (गुहेत) राहिलो. सरकारी घर मिळाल्याचा खूप आनंद झाला. मुलाचे शिक्षण करता आले नाही. मात्र नातू पंकज चार वर्षाचा झाला आहे. तो आता शाळेत जाईल. आमची पिढी जंगलातून गावात आली. आता टी. व्ही., लाईट पहायला मिळणार, याचा आनंद आहे, असे फोफसंडी येथील लाभार्थी कुसूम वळे यांनी सांगितले.
योजना पूर्तीचा आनंद    
अकोले तालुक्यात २०१८ -१९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १८४५, रमाई १६५, शबरी २२५ घरकुल पूर्ण झाली. किमान ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. पुढील १९ - २० मध्ये प्रधानमंत्री १४००, रमाई १७५ तर शबरीची सहाशे घरकुले मंजूर आहेत. उद्दिष्ट पूर्तीचा प्रयत्न आहे. वळे कुटुंब हे कित्येक वर्षे कपारीत राहत होते. स्वत: लक्ष घालून ग्रामसेवक व लाभार्थी यांना किचकट अटी तातडीने पूर्ण करण्यासाठी मदत केली. त्यांचे घरकुल पुर्ण झाले. योजना पूर्तीचा आनंद झाला, असे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी सांगितले. 
‘लोकमत’ने टाकला होता प्रकाशझोत 
तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने वळे कुटुंबावर प्रकाशझोत टाकला. त्यानंतर सरकारी यंत्रणा तातडीने गुहेत दाखल झाली होती.  जागा, कागदपत्रे यांची मोठी अडचण होती. अकोलेचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे थेट त्या गुहेत गेले. ग्र्रामसेवक अविनाश मंडलिक यांना आदेश देत कागदी सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर २०१८ - १९ या वर्षातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वळे यांना घर मंजूर झाले. गावठ्यातील एक मोकळी जागा पाहून तेथे टुमदार घर उभे राहिले आहे. वळे कुटुंबाला शंभर वर्षांनी घर काय असते हे पहायला मिळणार आहे. या दिवाळीत वळे कुटुंबीयांचा गृहप्रवेश होणार आहे, असे कुसूम वळे यांनी सांगितले. 

Web Title: Two generations lived in the caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.