पर्यटकांनो सावधान.. चांदबिबी महालाजवळ बिबट्याने दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 12:36 PM2020-06-07T12:36:39+5:302020-06-07T12:37:38+5:30

चांदबीबी महालावर नागरिक दररोज किंवा सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी मोठी गर्दी करतात. येथे रविवारी पर्यटकांंना बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.

Tourists beware .. Leopard sightings near Chandbibi Mahal | पर्यटकांनो सावधान.. चांदबिबी महालाजवळ बिबट्याने दर्शन

पर्यटकांनो सावधान.. चांदबिबी महालाजवळ बिबट्याने दर्शन

Next

अहमदनगर : शहरापासून जवळच असलेल्या चांदबीबी महालावर नागरिक दररोज किंवा सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी मोठी गर्दी करतात. येथे असलेल्या दाट झाडीमुळे या ठिकाणी अनेक वन्य प्राण्यांचे अस्तित्व देखील आहे. मात्र येथे रविवारी पर्यटकांंना बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.

रविवारी (दि.७) सकाळी नगरमधील अभिजित पाडळकर, पराग गावडे, प्रवीण राठोड व अन्य मित्र रविवारची सुटी असल्याने या भागात फिरायला गेले होते. महालाच्या अलिकडे त्यांना रस्त्यापासून जवळच मोरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे रस्ता सोडून ते डोंगर उतारावर उतरले. रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर ते मोरांच्या जवळ पोहोचले. 

यावेळी त्यांना बाजूच्या करवंदाच्या जाळीत मोरांच्या शिकारीसाठी बिबट्या दबा धरून बसलेला दिसला. हे तीन, चार जण जवळ पोहोचल्याचे पाहून त्याने डरकाळी फोडून पळ काढला. अचानक बिबट्या समोर दिसल्याने या युवकांनी घाबरून तेथून पळ काढला.
 
याबाबत युवकांनी निसर्गमित्र व जिल्ह्याचे व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना कळवले. येथे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. ठसे पाहता हा मध्यम वयाचा बिबट्या असून गेल्या आठ, दहा दिवसंपासून त्याचे या भागात वास्तव्य असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

 साबळे यांनी तातडीने जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. बी.पोकळे यांना याची माहिती दिली. याठिकाणी वनखात्याचे चेकपोस्ट आहे. या भागात नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना या ठिकाणी गस्त वाढवून नागरिकांच्या फिरण्यावर लक्ष ठेवण्याविषयी सूचना दिल्या आहेत, असे रेड्डी यांनी सांगितले. 

Web Title: Tourists beware .. Leopard sightings near Chandbibi Mahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.