माथेफिरु ट्रक चालकाच्या थरारक प्रवासाने अनेकांचा रोखला श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:05 PM2020-06-03T12:05:20+5:302020-06-03T12:05:29+5:30

शेवगाव/नेवासा : एका माथेफिरु ट्रक चालकाने नेवासा ते शेवगाव दरम्यान थरारक प्रवास केला. या प्रवासाने अनेकांना श्वास रोखला होता. पोलिसांनाही त्याने जेरीस आणले. कितीही अडथळे आणले तरी त्याने ते तोडत आपला शेवगावपर्यंत प्रवास पूर्ण केला. त्याच्यामागे जवळपास पन्नास पोलीस मागे धवतच राहिले. अखेर या ट्रकचालकाने शेवगाव येथील एका दुकानाला जोराची धडक दिली आणि लोकांचा जीव भांड्यात पडला. त्याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले.

The thrilling journey of the Mathefiru truck driver took the breath away of many | माथेफिरु ट्रक चालकाच्या थरारक प्रवासाने अनेकांचा रोखला श्वास

माथेफिरु ट्रक चालकाच्या थरारक प्रवासाने अनेकांचा रोखला श्वास

Next

अनिल साठे/सुहास पठाडे
शेवगाव/नेवासा : एका माथेफिरु ट्रक चालकाने नेवासा ते शेवगाव दरम्यान थरारक प्रवास केला. या प्रवासाने अनेकांना श्वास रोखला होता. पोलिसांनाही त्याने जेरीस आणले. कितीही अडथळे आणले तरी त्याने ते तोडत आपला शेवगावपर्यंत प्रवास पूर्ण केला. त्याच्यामागे जवळपास पन्नास पोलीस मागे धवतच राहिले. अखेर या ट्रकचालकाने शेवगाव येथील एका दुकानाला जोराची धडक दिली आणि लोकांचा जीव भांड्यात पडला. त्याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले.
सिनेमातल्या सिन प्रमाणे हा थरार नेवासा, शेवगावकरांनी मंगळवारी रात्री पाहिला मिळाला आहे. टाकळीभान येथे लक्झरी बसला हुलकावणी देत बेफान वेगाने नेवासाच्या दिशेने निघाला. या वेगवान ट्रक बद्दल सोशल मीडियावर मेसेज फिरताच नेवासा पोलिसांनी गणपती मंदिराजवळ नाका बंदी केली. त्याला अडवण्यासाठी उभा असलेल्या पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याने एस कॉर्नर,नेवासा बुद्रुक येथे येणाया-जाणाºया अनेकांना हुलकावणी दिली. नेवासा येथील नाका बंदी तोडत निघालेला ट्रकच्या मागे त्याला पकडण्यासाठी तब्बल पोलिसांनी सुमारे दहा मोटार सायकल,तीन जीप सह पन्नासहून अधिक नागरिक, पत्रकारांनी त्याचा पाठलाग केला. हा ट्रक शेवगावच्या दिशेने येत असल्याचे शेवगाव पोलिसांना कळवण्यात आले. त्यांनी ही प्रसंगावधान राखत तात्काळ नाकाबंदी केली. शेवगावच्या दिशेने येताना भेंडा, कुकाणा येथे रस्त्यावर हातगाडे लावत पोलीसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने वाहनाचा वेग न आवरता सर्व अडथळे तोडत शेवगाव गाठले.
याच दरम्यान एका गुन्ह्याचा तपासकामी मिरी येथे गेलेले उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी ही त्या ट्रकचा पाठलाग सुरु केला. मात्र माथेफिरु ट्रक चालकाने ट्रक कुठेच न थांबवता शेवगाव शहरातील क्रांती चौकातील एक मोबाईलच्या दुकानाला जोराची धडक दिली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र त्या दुकानाचे नुकसान झाले आहे. शेवगाव पोलिसांनी त्यास रोखण्यासाठी रस्त्यात अडथळे उभा केले होते. सदरच्या ट्रकचा चालकाच्या बाजूचा पुढील टायर कुकाणा फुटला. तरीही त्याने न थांबता गाडी चालवली. अखेर या थरारक प्रवास कोणतीही जीवित हानी न होता थांबला.

Web Title: The thrilling journey of the Mathefiru truck driver took the breath away of many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.