Thrill of 'The Burning Truck' on Nagar-Solapur route |  नगर-सोलापूर मार्गावर ‘द बर्निग ट्रक’ चा थरार

 नगर-सोलापूर मार्गावर ‘द बर्निग ट्रक’ चा थरार

कर्जत : नगर-सोलापूर मार्गावर तालुक्यातील नागलवाडी शिवारात ‘द बर्निग ट्रक’ चा थरार रविवारी पहाटे प्रवासी, वाहन चालकांनी अनुभवला. आगीत कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समजली आहे.

नगर-सोलापूर रोडवर नागलवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला सदर मालवाहतूक ट्रक जळत होती. मात्र याबाबत मिरजगाव पोलीस दुरक्षेत्रासह कर्जत पोलीस स्थानक अनभिज्ञ होते. 

या गाडीला नंबर प्लेट नसून ‘सरकार’ नाव आहे. या ट्रकमध्ये काय माल होता, ती कुठे चालली होती, आग कशाने लागली? हा अपघात की घातपात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आगीत ट्रक भस्मसात झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती कळविली आहे.
 

Web Title: Thrill of 'The Burning Truck' on Nagar-Solapur route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.