तीन हजार बाधित, तीन हजार ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:25+5:302021-04-23T04:23:25+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी ३०६५ रुग्णांना रुग्णालयातून बरे वाटत असल्याने घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३१७६ने वाढ ...

Three thousand affected, three thousand cold | तीन हजार बाधित, तीन हजार ठणठणीत

तीन हजार बाधित, तीन हजार ठणठणीत

Next

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी ३०६५ रुग्णांना रुग्णालयातून बरे वाटत असल्याने घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३१७६ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ६८ इतकी झाली आहे. दोन दिवसांमध्ये ५३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५२८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४३४ आणि अँटिजेन चाचणीत १२१४ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ७३, अकोले ८१, जामखेड २१, कर्जत १५३, कोपरगाव २९, नगर ग्रामीण ०४, नेवासा २२, पारनेर १, पाथर्डी ४७, राहता ४४, राहुरी २, शेवगाव १९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर २, कँटोन्मेंट बोर्ड ४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १३ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ४६२, अकोले ५४, जामखेड ४, कर्जत १३, कोपरगाव ७८, नगर ग्रामीण १०८, नेवासा ३३, पारनेर २२, पाथर्डी ४६, राहाता १८०, राहुरी ५२, संगमनेर १९९, शेवगाव २३, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर ७३, कँटोन्मेंट बोर्ड १८ आणि इतर जिल्हा ६२ आणि इतर राज्य २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज १२१४ जण बाधित आढळून आले. नगर शहर ८०, अकोले ६२, जामखेड ४१, कर्जत १७०, कोपरगाव ७१, नगर ग्रामीण १११, नेवासा ८३, पारनेर २२, पाथर्डी ४८, राहाता ७८, राहुरी १०४, संगमनेर २७, शेवगाव ९६, श्रीगोंदा ११२, श्रीरामपूर ९९, कँटोन्मेंट बोर्ड ४ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, बुधवारी २१ जणांचा, तर गुरुवारी ३२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही दिवसात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ८४ टक्के असल्याने दिलासा मिळाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : १,२४,६९०

उपचार सुरू असलेले रुग्ण : २२०६८

मृत्यू : १६८८

एकूण रुग्ण संख्या : १,४८,४४६

Web Title: Three thousand affected, three thousand cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.