‘त्या’ तीन रुग्णांना जिल्हा रुग्णालयाने तपासणी न करता परत पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 01:43 PM2020-03-25T13:43:53+5:302020-03-25T13:44:35+5:30

श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मिरजगाव येथील दत्तगल्लीतील एका तरूणासह आई-वडिलांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री आठ वाजता पाठवण्यात आले होते. मात्र कोणतीही तपासणी न करता त्यांना त्याच गाडीतून परत पाठवले. दरम्यान या रुग्णांवर मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

The 'three' patients were sent back to the district hospital without inspection | ‘त्या’ तीन रुग्णांना जिल्हा रुग्णालयाने तपासणी न करता परत पाठविले

‘त्या’ तीन रुग्णांना जिल्हा रुग्णालयाने तपासणी न करता परत पाठविले

Next

मिरजगाव : श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मिरजगाव येथील दत्तगल्लीतील एका तरूणासह आई-वडिलांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री आठ वाजता पाठवण्यात आले होते. मात्र कोणतीही तपासणी न करता त्यांना त्याच गाडीतून परत पाठवले. दरम्यान या रुग्णांवर मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
           गेली पाच सहा दिवसापासून हा तरूण बाहेरगावी असलेल्या विलगीकरणामध्ये ठेवलेल्या आपला भावाच्या सहवासात आला होता. मिरजगाव येथे आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करून त्याला मंगळवारी रात्री १०८ रुग्णवाहिकामधून आई-वडिलांसह कोरोनाचे काही लक्षणे आहेत का? हे तपासणी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र तेथे गेल्यावर बाह्य तपासणी करून त्यांना कोणतीही कोरोनाचे लक्षणे नाही असे सांगून त्यांना त्याच रुग्णवाहिकेतून मिरजगावला परत पाठवून दिले. यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. 
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय डॉ.हरिष दरवाज  यांनी सांगितले की, या तिन्ही जणांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांना होणाºया त्रासावर औषध उपचार सुरू आहेत. 

Web Title: The 'three' patients were sent back to the district hospital without inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.