वीज पडून तीन गायी ठार; आश्वी परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 04:46 PM2020-06-17T16:46:50+5:302020-06-17T16:54:34+5:30

संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील गायीच्या गोठ्यावर मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वीज पडून तीन गाई ठार झाल्या.या गायींची किंमत अडीच लाख रुपये होती. 

Three cows killed by lightning; Incidents in Ashwi area | वीज पडून तीन गायी ठार; आश्वी परिसरातील घटना

वीज पडून तीन गायी ठार; आश्वी परिसरातील घटना

googlenewsNext

 आश्वी : संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील गायीच्या गोठ्यावर मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वीज पडून तीन गाई ठार झाल्या.या गायींची किंमत अडीच लाख  रुपये होती. 

 मंगळवारी (१६) संध्याकाळी तालुक्याच्या पूर्व भागातील आश्वी व परिसरातील गावांमध्ये  विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यत पाऊस सुरू होता.

 रात्री नऊच्या सुमारास विजेचा मोठा कडकडाट होऊन ओझर बुद्रूक शिवारात ओझर बंधा-याजवळ राहाणा-या उत्तम बाबुराव क्षीरसागर या दूध उत्पादक शेतक-यांच्या गायीच्या गोठ्यावर वीज पडली. गोठ्यामध्ये बांधलेल्या सुमारे अडीच लाख रुपये किंमतीच्या तीन गायी जागेवरच मृत पावल्या. घटनेचा पंचनामा केला आहे.

Web Title: Three cows killed by lightning; Incidents in Ashwi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.