अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारी तीस गोवंश जनावरे पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 02:58 PM2020-09-25T14:58:50+5:302020-09-25T14:59:24+5:30

घारगाव (ता.संगमनेर) पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी नाशिक-पुणे महामार्गावरील आंबी खालसा गावच्या आंबी फाटा शिवारात अवैधरित्या तीस गोवंश जनावरांची सुटका केली.

Thirty cattle were caught going for illegal slaughter | अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारी तीस गोवंश जनावरे पकडली

अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारी तीस गोवंश जनावरे पकडली

Next

घारगाव : घारगाव (ता.संगमनेर) पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी नाशिक-पुणे महामार्गावरील आंबी खालसा गावच्या आंबी फाटा शिवारात अवैधरित्या तीस गोवंश जनावरांची सुटका केली. याप्रकरणी तीन आरोपींसह जनावरांना ताब्यात घेतले आहे.

 गुरुवारी सायंकाळी चार  वाजण्याच्या सुमारास एक पिकअप आळेफाट्याकडून संगमनेरकडे कत्तलीसाठी गोवंश जातीची जनावरे नेत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार सहाय्यक फौजदार सय्यद, पो.कॉ.प्रमोद चव्हाण, राजेंद्र लांघे , पो.कॉ. हरिचंद्र बांडे, संतोष फड यांनी पिकअप (क्रमांक एम.एच.१४ ए.झेड.४८१०) चा पाठलाग करून आंबीफाटा येथे थांबविले. 

प्रशांत मारुती नाईकवाडी (वय २०), हासनैन जावेद कुरेशी (वय १९), रमजान युसूफ चौगुले (वय २२, सर्व  रा.बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे) हे आरोपी एक लाख चार हजार रुपये किमतीचे लहान मोठे तीस गोवंशी जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना आढळून आले. यात पिकअपसह एकूण चार लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल घारगाव पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी जनावरे ताब्यात घेऊन तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Thirty cattle were caught going for illegal slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.