शाश्वत बियाण्यांसाठी बियाणे बँकांची चळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:28+5:302021-01-20T04:22:28+5:30

पोपेरे म्हणाल्या, प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावांमध्ये देशी बियाण्यांच्या बँक निर्माण व्हाव्यात. देश सशक्त करण्यासाठी गावठी आणि पारंपरिक बियाण्यांपासून तयार ...

There should be a movement of seed banks for sustainable seeds | शाश्वत बियाण्यांसाठी बियाणे बँकांची चळवळ व्हावी

शाश्वत बियाण्यांसाठी बियाणे बँकांची चळवळ व्हावी

Next

पोपेरे म्हणाल्या, प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावांमध्ये देशी बियाण्यांच्या बँक निर्माण व्हाव्यात. देश सशक्त करण्यासाठी गावठी आणि पारंपरिक बियाण्यांपासून तयार केलेल्या भाज्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तरच येणारी पिढी सक्षम आणि सुदृढ निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामर्थ्यवान भारत निर्माण करण्यासाठी व शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. कौटुंबिक जबाबदारीतून मी बऱ्यापैकी बाहेर पडलेली असून, या पुढील आयुष्य हे समाजासाठी आणि गरीब शेतकऱ्यांसाठी जगायचे आहे. कोंभाळणेसारख्या आदिवासी आणि छोट्याशा गावातून सुरू केलेली देशी वाण व बीज संवर्धनाची चळवळ देशव्यापी बनवण्यासाठी त्यांनी संसदेतील सर्व खासदारांना आवाहन केले. बायफचे विषयतज्ज्ञ संजय पाटील यांनी बायफ संस्थेतर्फे होत असलेले बायोडायव्हर्सिटी कंजर्वेशन संदर्भातील काम व त्याची व्याप्ती उपस्थितांसमोर मांडली.

Web Title: There should be a movement of seed banks for sustainable seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.