१४०० मुख्याध्यापकांना बसायला कक्षच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:39+5:302021-02-24T04:23:39+5:30

(डमी) अहमदनगगर : एकीकडे खासगी शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष, शिक्षकांचे स्टाफ रूम एअर कंडिशन असताना दुसरीकडे नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या ...

There is no room for 1400 headmasters | १४०० मुख्याध्यापकांना बसायला कक्षच नाही

१४०० मुख्याध्यापकांना बसायला कक्षच नाही

Next

(डमी)

अहमदनगगर : एकीकडे खासगी शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष, शिक्षकांचे स्टाफ रूम एअर कंडिशन असताना दुसरीकडे नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या तब्बल १४०० मुख्याध्यापकांना बसायला खोलीच नाही. तर ५८७ वर्गखोल्या कमी असल्याने दोन वर्गाचे विद्यार्थी एकाच खोलीत बसतात. परिणामी विद्यार्थ्यांचे वर्ग आणि शाळेचे व्यवस्थापन एकाच खोलीत भरवण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे.

खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये फारशा भौतिक सुविधा नसतात. परंतु अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळाही हायटेक झाल्या आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत जिल्हा परिषद शाळा खासगीपेक्षा कुठेही कमी नाहीत. मात्र निधीअभावी अजूनही बऱ्याच ठिकाणी वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था नाही. खासगी शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था असते. शाळेत वर्ग घेतल्यानंतर शिक्षकाला काही काळ विश्रांतीची गरज असते. तसेच शाळेतील महत्त्वाची कागदपत्र ठेवण्यासाठी आणि शाळेचे व्यवस्थापन हाताळण्यासाठी मुख्याध्यापकाला वेगळा कक्ष असणे बंधनकारक आहे.

नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३५७३ शाळा आहेत. त्यातील ५८७ शिक्षकांना वर्गखोल्या नाहीत, तर तब्बल १४०४ मुख्याध्यापकांना बसण्यासाठी स्वतंत्र खोली नसल्याने शाळेचे व्यवस्थापन व विद्यार्थ्यांचे वर्ग एकाच खोलीत भरवण्याची नामुष्की शिक्षकांवर आली आहे.

---------------

अडचणींचा डोंगर

बऱ्याचदा एकाच शिक्षकाला दोनपेक्षा अधिक वर्ग सांभाळावे लागतात. स्टाफ रूम नसल्याने शिक्षकांना शालेय विषयांवर एकत्र बसून चर्चा करता येत नाही. एखादा वर्ग रिकामा असेल तर तेथेच कशीबशी बैठक उरकली जाते किंवा एका वर्गात दोन तुकड्या बसवून उर्वरित वर्ग स्टाफ रूम म्हणून वापरला जातो.

----------

माध्यमिक, उच्च माध्यमिकला सुविधा

माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष, शिक्षकांसाठी स्टाफ रूम, तसेच इतर कार्यक्रमांसाठी खोल्यांची सोय असते. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनाच भौतिक सुविधा नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन खोल्यांची संख्या वाढवण्याची मागणी शिक्षकांतून होत आहे.

--------

फोटो - २३शाळा खोली

Web Title: There is no room for 1400 headmasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.