कोरोनाबाधित रुग्णांची माहिती लपविणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:59+5:302021-07-31T04:22:59+5:30

शेवगाव : काही डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांची माहिती लपवत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांना तालुका प्रशासनाने सूचना द्याव्यात. तरीही ऐकत नसतील ...

Take action against doctors who hide coronary artery disease information | कोरोनाबाधित रुग्णांची माहिती लपविणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा

कोरोनाबाधित रुग्णांची माहिती लपविणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा

Next

शेवगाव : काही डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांची माहिती लपवत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांना तालुका प्रशासनाने सूचना द्याव्यात. तरीही ऐकत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शेवगाव तालुका प्रशासनाला दिले.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी भातकुडगाव येथे शुक्रवारी सायंकाळी आले होते. यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी संकल्प लोणकर, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, श्रीकांत गोरे, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मल्हरी इसरवाडे, आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर, वैद्यकीय अधिकारी सुप्रिया लुणे, अशोक वाघमोडे, वसंत घुमरे, कल्याण काळे, माजी सरपंच राजेश फटांगरे, संजय कोळगे, बाबासाहेब जमधडे, सोपान वडणे, राजेंद्र लोमटे, चंदू फटांगरे, अमोल नजन, पाराजी नजन, सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस नाईक बाबासाहेब शेळके, कामगार तलाठी गणेश लोखंडे, ग्रामविकास अधिकारी दिलदार बागवान, अर्जुन वाघमोडे, बापू वाघमोडे, आरोग्य सेविका व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवले तसे स्वयंशिस्तीने कोरोना निर्बंधाचे पालन करावे. त्यातूनच आपले गाव कोरोनामुक्त करा. दशक्रिया विधी, उद्घाटनाचे कार्यक्रम अशा ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन भोसले यांनी केले.

---

लग्न सोहळ्यांमुळे कोरोनाचा कहर...

भातकुडगाव येथील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने ग्रामपंचायतीने दहा दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी भोसले यांनी येथील प्रतिबंधक उपाययोजनांची पाहणी केली. येथील शाळेत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्याच्या सूचना केल्या. गावासह परिसरात गेल्या काही दिवसांत पाच ते सहा लग्न सोहळे पार पडले. त्यानंतर कोरोना कहर सुरू झाल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Take action against doctors who hide coronary artery disease information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.