सुशांतसिंह प्रकरणात सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला; राधाकृष्ण विखे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 04:40 PM2020-08-22T16:40:47+5:302020-08-22T16:41:01+5:30

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. परंतू  सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.

In Sushant Singh's case, the government tried to suppress the truth; Allegation of Radhakrishna Vikhe | सुशांतसिंह प्रकरणात सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला; राधाकृष्ण विखे यांचा आरोप

सुशांतसिंह प्रकरणात सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला; राधाकृष्ण विखे यांचा आरोप

Next

लोणी : सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. परंतू  सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.

      पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाची स्थापना केल्यानंतर आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने सुरु केला आहे. यातून खरे सत्य निश्चित समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारसमोर निर्णय घेण्याचे कोणतेच धोरण नाही. शाळा उघडण्यापासून ते महाविद्यालयांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही? याबाबत सरकारकडे स्वत:ची भूमिका नसल्याने सरकार गोंधळलेल्या अवस्थेत काम करीत असल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

समाजहिताचे कोणतेच निर्णय सरकार घेवू शकत नाही. शेतकरी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. मंत्र्यांचेच  दूधसंघ असल्याने त्यांनीच सरकारची अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकºयांच्या पदरी काहीच पडलेले नाही, असेही विखे म्हणाले.  
 

Web Title: In Sushant Singh's case, the government tried to suppress the truth; Allegation of Radhakrishna Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.