सुजय विखेंचा 'ओव्हर कॉन्फिडन्स'; म्हणे, '20 वर्षं मीच 'खासदार' राहणार!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 01:20 PM2019-09-18T13:20:42+5:302019-09-18T14:56:07+5:30

सुजय विखे यांची मुक्ताफळे : कामे करतो पण पुन्हा निवडून द्या

Sujay Vikhe's statement of politics; Say, 'I will be an MP for 20 years!' | सुजय विखेंचा 'ओव्हर कॉन्फिडन्स'; म्हणे, '20 वर्षं मीच 'खासदार' राहणार!'

सुजय विखेंचा 'ओव्हर कॉन्फिडन्स'; म्हणे, '20 वर्षं मीच 'खासदार' राहणार!'

Next
ठळक मुद्देसुजय विखे आपल्या भाषणावरुन आणि हरकतीवरुन नेहमीच चर्चेत असतात.

अहमदनगर : भाजपा नेते आणि अहमदनगर मतदारसंगाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी स्वत:बद्दलच पुढील 20 वर्षांचं राजकीय भाकीत वर्तवलं आहे. आगामी 20 वर्षे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा मीच खासदार राहणार आहे. तुमची कामे करायची असतील तर पुन्हा मलाच निवडून द्या, असे वक्तव्य भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे विकास कामांचे उदघाटन झाले. त्याप्रसंगी विखे यांनी वरील वक्तव्य केले.

सुजय विखे आपल्या भाषणावरुन आणि हरकतीवरुन नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावरुनही नेहमीच त्यांना ट्रोल करण्यात येते. काही दिवसांपूर्वी संगमनेर येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत, इंदुरीकर महाराजांना भाजपाची टोपी (गमझा) घालण्याचा प्रयत्न सुजय यांनी केला होता. मात्र, महाराजांनी सुजय यांचा हात पकडत मी कुठल्याही राजकीय पक्षाचं बॅनर लावून घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच, सुजय यांना रोखलं. या घटनेची चांगलीच चर्चा अहमदनगर जिल्ह्यात रंगली होती. तर, या घटनेवरुन नेटीझन्सनंही सुजय यांना टीकेचं धनी बनवलं. त्यानंतर, आता पुढील 20 वर्षे मीच खासदार राहणार, असे म्हणल्यामुळे सुजय यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. 

नगर येथील एका कार्यक्रमात ‘पुढचाही खासदार मीच आहे. तुमची कामे करायची असतील तर पुन्हा मलाच निवडून द्या. आगामी काळातही भाजपचीच सत्ता राहणार आहे. माझ्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. तुमचे काय प्रश्न असतील ते मीच सोडविणार आहे. काम करताना विखे पाटील यांचा शब्द महत्त्वाचा असतो. ते कागदावर कधीही आश्वासन देत नाहीत. म्हणून तुम्हाला जे काही आश्वासन देतो, ते पूर्ण होईलच, यात शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानावरून राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Sujay Vikhe's statement of politics; Say, 'I will be an MP for 20 years!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.