शाळकरी विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; श्रीगोंदा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:48 PM2020-02-23T12:48:15+5:302020-02-23T12:49:26+5:30

दहावीत शिकत असलेल्या वडाळी येथील अल्पवयीन मुलीने घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला अंगातील जर्किनने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

Suicide committed by schoolchildren; Events in Shrigonda taluka | शाळकरी विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; श्रीगोंदा तालुक्यातील घटना

शाळकरी विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; श्रीगोंदा तालुक्यातील घटना

Next

श्रीगोंदा : दहावीत शिकत असलेल्या वडाळी येथील अल्पवयीन मुलीने घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला अंगातील जर्किनने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथे शनिवारी रात्री (२२ फेब्रुवारी) घडली.
वडाळी येथील हारून सय्यद यांची मुलगी नगिना सय्यद ही श्रीगोंदा येथील एका विद्यालयात दहावीत शिकत होती. दि २२ फेब्रुवारी रोजी घरात सर्व जेवण करण्यासाठी बसले असता नगिना तेथे नव्हती. घरातील सर्वांनी तिला शेजारच्यांकडे पाहिले. मात्र, ती तेथे आढळली नाही. त्यामुळे तिचा सर्वांनी शोध घेतला असता ती त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला जर्किनच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. यानंतर घरच्यांनी सदर घटनेची श्रीगोंदा पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: Suicide committed by schoolchildren; Events in Shrigonda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.