श्रीगोंद्यातील दूध उद्योजक सुभाष शिंदे गायब झाल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 03:20 PM2019-09-19T15:20:24+5:302019-09-19T15:23:28+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील दूध उद्योजक सुभाष पांडुरंग शिंदे हे राहत्या घरातून गायब झाले आहेत.

subhash shinde missing from shrigonda ahmednagar | श्रीगोंद्यातील दूध उद्योजक सुभाष शिंदे गायब झाल्याने खळबळ

श्रीगोंद्यातील दूध उद्योजक सुभाष शिंदे गायब झाल्याने खळबळ

Next

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) - श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील दूध उद्योजक सुभाष पांडुरंग शिंदे (वय-48) हे राहत्या घरातून गायब झाले आहेत. या संदर्भात दौड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष शिंदे यांचा दौड तालुक्यातील शिरापूर येथे दूध डेअरी फार्म आहे. ते दौड येथील पंचवटी अपार्टमेंट जनता कॉलनीत राहत होते. ते बुधवारी (18 सप्टेंबर)  संध्याकाळी 6.30 वाजता आंबेडकर चौक या ठिकाणावरून ते थोडे बाहेर जाऊन येतो असे त्यांच्या चालकाला सांगून गेले तेव्हापासून बेपत्ता आहेत.

सुभाष शिंदे यांनी पाच वर्षापूर्वी शिरापूरजवळ परिवार नावाने डेअरी सुरू केली होती. पण व्यवसायात अडचणी निर्माण झाल्याने ते बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: subhash shinde missing from shrigonda ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.