मैलामिश्रित पाणी सोडले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:14+5:302021-07-30T04:23:14+5:30

उपमहापौर गणेश भोसले यांनी भूषणनगर येथील सावली सोसायटीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गेल्या दहा वर्षांपासून या भागांमध्ये ...

On the streets left dirty water | मैलामिश्रित पाणी सोडले रस्त्यावर

मैलामिश्रित पाणी सोडले रस्त्यावर

Next

उपमहापौर गणेश भोसले यांनी भूषणनगर येथील सावली सोसायटीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गेल्या दहा वर्षांपासून या भागांमध्ये मनपाच्या कुठल्याही सुविधा नाहीत. आम्ही सर्व नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी भरतो. परंतु, पालिकेकडून कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. वहिवाटीचा रस्ता देखील नाही. पाऊस पडल्यानंतर घरापर्यंत जाणे शक्य होत नाही. काहींनी चेंबरचे पाणी मोकळ्या जागेत सोडून दिल्यामुळे सर्वत्र मैलामिश्रित पाणी पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या भागात डेंग्यूचे विविध रुग्ण आढळून येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मैलामिश्रित पाणी मिक्स होऊन नळाला दुर्गंधीयुक्त वास येत आहे. पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. नागरिकांनी स्वखर्चाने पथदिवे बसविले आहेत. त्यावर रस्त्याच्या कामास लगेच सुरुवात केली जाईल. बंद पथदिवे सुरू करण्यात येतील. ड्रेनेज लाईनचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. सुमारे २ किलोमीटरची मोठी ड्रेनेज लाईन टाकावी लागणार आहे. यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन या भागातील नागरिकांना भोसले यांनी दिले.

...

सूचना फोटो: २९ एएमसी नावाने आहे.

Web Title: On the streets left dirty water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.