राज्य सरकारचे शेतक-यांच्या मदतीचे पॅकेज फसवे, फक्त बदल्यांचा कारभार सुरू; राधाकृष्ण विखे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 10:06 AM2020-10-25T10:06:17+5:302020-10-25T10:06:50+5:30

महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये  घातलेल्या अटीमुळे शेतक-यांचा विश्वासघात झाला आहे. यामुळे शेतकरी  मदतीपासून वंचित  राहण्याची शक्यता अधिक आहे, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

The state government's aid package to farmers is fraudulent, only transfers continue; Allegation of Radhakrishna Vikhe | राज्य सरकारचे शेतक-यांच्या मदतीचे पॅकेज फसवे, फक्त बदल्यांचा कारभार सुरू; राधाकृष्ण विखे यांचा आरोप

राज्य सरकारचे शेतक-यांच्या मदतीचे पॅकेज फसवे, फक्त बदल्यांचा कारभार सुरू; राधाकृष्ण विखे यांचा आरोप

googlenewsNext

शिर्डी :  महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये  घातलेल्या अटीमुळे शेतकºयांचा विश्वासघात झाला आहे. यामुळे शेतकरी  मदतीपासून वंचित  राहण्याची शक्यता अधिक आहे, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

आ.विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात शेतक-यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करुन जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. बांधावर जावून यापूर्वी मदतीबाबत  केलेल्या वल्गनाही महाविकास आघाडीचे नेते विसरले असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारकडून सामान्य माणसाच्या   हिताची कोणतीच काम होत नाहीत. मंत्रालयातून फक्त बदल्यांचा कारभार सूरू असून यासाठी मेनू कार्ड तयार केले आहे. आज पर्यत झालेल्या बदल्यांना मॅटने स्थगिती देताना आहे त्याच जागी अधिकाºयांना ठेवण्याचा आदेश दिल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. मंत्री बांधावर दिसण्यापेक्षा फक्त पत्रकार परिषदेतूनच दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: The state government's aid package to farmers is fraudulent, only transfers continue; Allegation of Radhakrishna Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.