कल्याण रोड परिसरात आरोग्य केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:22 AM2021-05-07T04:22:36+5:302021-05-07T04:22:36+5:30

अहमदनगर : प्रभाग क्रमांक आठ मध्ये कल्याण रोड परिसरात तातडीने आरोग्य केंद्र व लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी ...

Start a health center in Kalyan Road area | कल्याण रोड परिसरात आरोग्य केंद्र सुरू करा

कल्याण रोड परिसरात आरोग्य केंद्र सुरू करा

Next

अहमदनगर : प्रभाग क्रमांक आठ मध्ये कल्याण रोड परिसरात तातडीने आरोग्य केंद्र व लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक सचिन शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे गुरुवारी केली.

नरगसेवक शिंदे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कल्याण रोड परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. या भागात अद्याप आरोग्य केंद्र व लसीकरण केंद्र सुरू झाले नाही. इतर भागात आरोग्य केंद्र व लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. मात्र कल्याण रोड परिसरामध्ये लसीकरण केंद्र सुरु झाले नसल्यामुळे नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. या भागात मध्यम कुटुंबातील तसेच गोरगरीब नागरिक वास्तव्यास आहेत. या सर्व नागरिकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जावे लागते. तिथे बेड मिळत नाहीत. त्यामुळे या भागातील नागिरकांना कोरोनावरील उपचार मिळत नसल्याने या भागात महापालिकेने तातडीने आरोग्य सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

Web Title: Start a health center in Kalyan Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.