तलाठ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण; बालमटाकळी येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:21 PM2020-02-26T12:21:20+5:302020-02-26T12:21:49+5:30

माझ्या आजोबांच्या बक्षिस पत्रावर कोणी हरकत घेतली हे दाखव.. असे म्हणत बीड जिल्ह्यातील घोगस गावच्या एका इसमाने बालमटाकळी (ता.शेवगाव) येथील तलाठ्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली.

Stabbed to death; The incident at Balmatakali | तलाठ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण; बालमटाकळी येथील घटना 

तलाठ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण; बालमटाकळी येथील घटना 

Next

शेवगाव : माझ्या आजोबांच्या बक्षिस पत्रावर कोणी हरकत घेतली हे दाखव.. असे म्हणत बीड जिल्ह्यातील घोगस गावच्या एका इसमाने बालमटाकळी (ता.शेवगाव) येथील तलाठ्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली.
 बालमटाकळी सज्जाचे तलाठी बाबासाहेब जगन्नाथ अंधारे यांनी याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात सुभाष सोनवणे (रा.पारगाव घोगस, ता.शिरूर,जि.बीड) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अंधारे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. मंगळवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुभाष सोनावणे कार्यालयात आले. माझे आजोबा काशिनाथ दगडू सोनावणे यांनी बक्षिसपत्र केलेल्या माझ्या नोंदीवर कोणी हरकत घेतली आहे. याची मला तक्रार दाखवा..असे म्हणाले. मी त्यांना तक्रार दाखविली. यावेळी त्यांनी सदर तक्रारीची कॉपी मला मागितली. मी त्यांना रितसर अर्ज द्यावा लागेल. तुम्हाला कॉपी देतो.. असे सांगितले. याचा त्यांना राग आला. त्यांनी  माझ्या शासकीय कामात अडथळा केला. मला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. असे  फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पावरा हे करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सोनावणे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
.....

Web Title: Stabbed to death; The incident at Balmatakali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.