सभापतींकडून भुयारी गटार योजनेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:26 AM2021-04-30T04:26:47+5:302021-04-30T04:26:47+5:30

..... पाणीपुरवठा विस्कळीतच अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेची दुरुस्ती व महावितरण खंडित केलेला विद्युत पुरवठा यामुळे शहरातील ...

Speaker inspected the underground sewerage scheme | सभापतींकडून भुयारी गटार योजनेची पाहणी

सभापतींकडून भुयारी गटार योजनेची पाहणी

Next

.....

पाणीपुरवठा विस्कळीतच

अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेची दुरुस्ती व महावितरण खंडित केलेला विद्युत पुरवठा यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, काही भागाला सहा दिवसांनंतरही पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.

...

लसीकरणाचे नियोजन करण्याची भाजपची मागणी

अहमदनगर : महापालिकेच्या वतीने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून, लसीकरणाचे महापालिकेने नियोजन करावे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी शहर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

....

मनपाची कारवाई सुरूच

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंधांचे पालन नागरिकांकडून केले जात नसल्याने महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली कारवाईची मोहीम सुरूच आहे. शहरातील दुकानदार व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

...

पेट्रोल न मिळाल्याने रुग्ण व नातेवाइकांची धावपळ

अहमदनगर : कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाइकांची धावपळ सुरू असते. रुग्णालयांचा शोध घेण्यापासून ते औषधे व जेवण पोहोच करण्याचे काम नातेवाईक करत असून, त्यांनाही पंपावर पेट्रोल दिले जात नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असून, याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणीही पुढे येत आहे.

...

Web Title: Speaker inspected the underground sewerage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.