...तर हा स्थानिक परिचारिकांचा अपमान; संघटनेचे अजय क्षीरसागर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:08 PM2020-06-02T13:08:59+5:302020-06-02T13:09:56+5:30

राज्यातील परिचारिका कोरोनाबाधीत रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत. असे असताना दुस-या राज्यातून परिचारिका मागवून सरकारने स्थानिक परिचारिकांवर अविश्वास दाखवला  आहे, असे महाराष्ट्र राज्य परिचर्या व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीचे संंघटक अजय क्षीरसागर यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. 

... so this is an insult to the local nurses; Opinion of Ajay Kshirsagar of the organization | ...तर हा स्थानिक परिचारिकांचा अपमान; संघटनेचे अजय क्षीरसागर यांचा इशारा

...तर हा स्थानिक परिचारिकांचा अपमान; संघटनेचे अजय क्षीरसागर यांचा इशारा

Next

विसापूर : राज्यातील परिचारिका कोरोनाबाधीत रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत. असे असताना दुस-या राज्यातून परिचारिका मागवून सरकारने स्थानिक परिचारिकांवर अविश्वास दाखवला  आहे, असे महाराष्ट्र राज्य परिचर्या व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीचे संंघटक अजय क्षीरसागर यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. 

 कोरोना लढ्यात राज्यातील परिचारिका थेट रुग्णांच्या संपर्कात येऊन काम करीत आहेत. केवळ त्यांचा संपर्क रुग्णाशी जास्त येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नर्सेसचा कोरोनाबाधीत आकडा वाढत आहे. एवढे काम करूनही आमच्या महाराष्ट्रातील नर्सेसवर सरकार अविश्वास दाखवत असाल तर तो समन्वय समिती खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 वर्ड हेल्थ आॅरगझेशनने नर्सेसची दाखल घेतली असताना सरकार त्यांच्यावर अविश्वास दाखवून महाराष्ट्रातील नर्सेस कमी पडत आहे हे दाखवून देत आहे. ही आपल्या राज्याची परिणामी या पदाची निंदा केल्यासारखे आहे. शासनाने एकही बैठक आमच्या संघटनेसोबत घेणे उचित समजले नाही, अजय क्षीरसार यांनी पत्रकात म्हटले आहे. 

Web Title: ... so this is an insult to the local nurses; Opinion of Ajay Kshirsagar of the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.