Shiv Sena shows Marathi arrow - Balasaheb Thorat |        शिवसेनेने मराठी बाणा दाखविला- बाळासाहेब थोरात  
       शिवसेनेने मराठी बाणा दाखविला- बाळासाहेब थोरात  

संगमनेर : शिवसेनेने मराठी बाणा दाखविला आहे. शिवसेना, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांना एकत्र येवून पाच वर्ष सरकार चालवायचे असल्याने त्यातील बारकावे, त्रुटी तपासायला पाहिजे. कुठलीही शंका न ठेवता एकत्र पध्दतीने पुढे गेलं पाहिजे, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले. 
   संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या विश्रामगृहात शनिवारी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार थोरात यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा  मारल्या. आमदार डॉ.सुधीर तांबे यावेळी उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, चार दिवस जातील. पण जे काही होईल ते चांगले होईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेला सत्तास्थापनेचा दावा म्हणजे भाजपला २२० जागा मिळणार असल्यासारखे आहे. 
भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याकरिता कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकत्र येण्याचा त्यांचा आग्रह असून येथेही कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस व शिवसेना एकत्र येवू शकतात. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Shiv Sena shows Marathi arrow - Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.