Shirdi Lok Sabha Election 2019 live result & winner: shivsena candidate sadashiv lokhande win | शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिर्डीचे साईबाबा शिवसेनेला पावले, सदाशिव लोखंडे पुन्हा जिंकले!
शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिर्डीचे साईबाबा शिवसेनेला पावले, सदाशिव लोखंडे पुन्हा जिंकले!

अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोेखंडे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला. या तिहेरी लढतीमध्ये सेनेचे शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. लोखंडे यांनी १ लाख २० हजार १९५ मतांनी विजय मिळविला.
शिर्डी मतदारसंघात सुरुवातीपासून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी आघाडी घेतली. मतमोजणीच्या एकूण २४ फे-या झाल्या. त्यानंतर पोस्टल मतदानाची मोजणी झाली. सदाशिव लोखंडे यांना ४ लाख ८६ हजार ८२० मते मिळाली. तर काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना ३ लाख ६६ हजार ६२५ मते मिळाली आहे. तर अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांना ३५ हजार ५२६ मते मिळाली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.५४ टक्के मतदान झाल. गेल्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ५ लाख ३२ हजार ५७७ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ३ लाख ३२ हजार ७१२ मतं मिळाली होती.

ही पाहा आकडेवारी

विधानसभाखा.सदाशिव लोखंडे (शिवसेना) आ. भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)लीड
अकोले49,51481,16531,651(कांबळे)
संगमनेर82216745917619 (लोखंडे)
शिर्डी1,03,07640,89062,186 (लोखंडे)
कोपरगाव88,64349,34439,299(लोखंडे)
श्रीरामपूर86,63965,18121,458 (लोखंडे)
नेवासा726765294219,734 (लोखंडे)
एकूण4,83,4493,64,1131,19,336 (लोखंडे)
 


Web Title: Shirdi Lok Sabha Election 2019 live result & winner: shivsena candidate sadashiv lokhande win
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.