साई जन्मस्थळाच्या वादावरून आजपासून शिर्डी बंद ग्रामसभेत निर्णय : साई मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:09 PM2020-01-18T22:09:53+5:302020-01-18T22:12:15+5:30

शिर्डी : साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून शिर्डी शहर शनिवारी मध्यरात्रीपासूनच बेमुदत बंद राहणार आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर भाविकांसाठी उघडे राहणार असून शहरातील दुकाने, बाजार बंद राहणार आहे. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.

Shirdi closed Gram Sabha decision on Sai birthplace dispute today: Sai temple to be openसाई जन्मस्थळाच्या वादावरून आजपासून शिर्डी बंद ग्रामसभेत निर्णय : साई मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार | साई जन्मस्थळाच्या वादावरून आजपासून शिर्डी बंद ग्रामसभेत निर्णय : साई मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार

साई जन्मस्थळाच्या वादावरून आजपासून शिर्डी बंद ग्रामसभेत निर्णय : साई मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार

Next

शिर्डी : साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून शिर्डी शहर शनिवारी मध्यरात्रीपासूनच बेमुदत बंद राहणार आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर भाविकांसाठी उघडे राहणार असून शहरातील दुकाने, बाजार बंद राहणार आहे. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.
साईबाबा जन्मस्थळाचे पाथरीसह आठही दावे तथ्यहीन व भाविकांची दिशाभूल करणारे आहेत़  पाथरीला निधी देण्यास विरोध नाही, मात्र जन्मस्थळाच्या उल्लेखाला तीव्र आक्षेप आहे.़ मुख्यमंत्री आपले विधान मागे घेत नाहीत, तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद करण्याचा निर्णय  शिर्डीतील ग्रामसभेत घेण्यात आला़  द्वारकामाई मंदिराच्यासमोर झालेल्या व लक्ष्मीबाई शिंदे यांचे नातू सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिर्डी व पंचक्रोशीतील हजारो नागरिक व साईभक्त उपस्थित होते. 
साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या वंशजांनीही साईबाबांच्या जन्म, गाव, जात, धर्माबद्दल आमच्या पुर्वजांनाही काही माहिती नव्हती, असे सांगितले़ यात तात्या कोतेंचे नातू मुकुंदराव कोते, नंदलाल मारवाड्याचे वंशज दिलीप संकलेचा, म्हाळसापतीचे पणतू दीपक नागरे, अब्दुल बाबाचे पणतू गणीभाई पठाण, भागोजी शिंदेचे पणतू सचिन शिंदे आदींचा समावेश होता़. साईबाबांनी आपला जात, धर्म सांगितला नाही़ साईसच्चरित्रातही त्याचा उल्लेख नाही. आम्हालाही कधी आमच्या पुर्वजांनी सांगितला नाही़ त्यामुळे पाथरीसह सर्वच जन्मस्थळाच्या दाव्याला आपला तीव्र विरोध असल्याचे वंशजांनी सांगितले़
राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तींनाही चुकीची माहिती देऊन बाबांच्या जन्मस्थळाच्या रूपाने वाद उपस्थित करण्यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला़ पाथरीला निधी देण्यास मुळीच आक्षेप नाही. मात्र त्याला जन्मस्थळाची ओळख नको. साईबाबांची समाधी होऊन १०१ वर्षे झाली. त्यानंतर हा वाद उपस्थित करण्यात आला़  वारंवार साईबाबांच्या बाबत वाद उभे करण्यात येतात. यामागे षड्यंत्र असल्याची शंकाही ग्रामसभेत उपस्थित  करण्यात आली़ मुख्यमंत्र्यांना कदाचित चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख केला़  याबाबत त्यांनी तत्काळ खुलासा करावा व भाविकांचा संभ्रम व संताप दूर करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. 
----------
मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे- विखे
मुख्यमंत्र्यांनी साई जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे. यातून करोडो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर फुंकर घालावी, असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्निवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़ विखे म्हणाले, जन्मस्थळाबाबत जे दावे केले जातात. त्याला पाठबळ देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करू नये. या संदर्भात शासन समिती नेमण्याच्या विचारात आहे. त्यास आपला पूर्ण विरोध असून त्याची आवश्यकताच नाही. साईबाबांनी कधी जात- धर्म सांगितला नाही. साईसच्चरित्रातही तसा उल्लेख नाही़ अनेक प्रयत्न करून तो ब्रिटिशांनाही शोधता आला नाही़ त्यामुळे ते जगभर सर्वधर्म समभावाचे प्रतिक बनले आहेत़ पाथरीला निधी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र तो जन्मस्थळाच्या नावाने देऊ नये. 
---
साई मंदिर सुरू, मार्केट बंद
बंद काळात साईमंदिर, प्रसादालय, भक्तनिवास, रूग्णालये, मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत़ तर हार-फुलांची व अन्य दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी बंद राहणार आहे़
--
 

Web Title: Shirdi closed Gram Sabha decision on Sai birthplace dispute today: Sai temple to be openसाई जन्मस्थळाच्या वादावरून आजपासून शिर्डी बंद ग्रामसभेत निर्णय : साई मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.