शेवगाव मतदारसंघ निवडणूक निकाल : भाजपच्या मोनिका राजळे विजयी; राष्ट्रवादीचे ढाकणे पराभूत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 03:01 PM2019-10-24T15:01:27+5:302019-10-24T15:01:56+5:30

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी जागा राखण्यात यश मिळविले आहे. राजळे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली.

Sheggaon constituency election results: BJP's Monica Rajale wins; The cover of the nationalist is defeated | शेवगाव मतदारसंघ निवडणूक निकाल : भाजपच्या मोनिका राजळे विजयी; राष्ट्रवादीचे ढाकणे पराभूत 

शेवगाव मतदारसंघ निवडणूक निकाल : भाजपच्या मोनिका राजळे विजयी; राष्ट्रवादीचे ढाकणे पराभूत 

googlenewsNext

पाथर्डी : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी जागा राखण्यात यश मिळविले आहे. राजळे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली.
पहिल्या काही फे-यांमध्ये ढाकणे यांनी आघाडी घेतली होती. शेवगाव तालुक्यातून ढाकणे यांना आघाडी मिळाली. मात्र पाथर्डी तालुक्यातील मतमोजणी सुरू होताच राजळेंनी पिछाडी भरून काढत आघाडी घेतली. पाथर्डी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथे राजळे यांना पाथर्डीतून मताधिक्य मिळाले.

दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. ढाकणे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली होती. याशिवाय राजळे यांच्यासाठी पंकजा मुंडे यांचीही सभा झाली होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात निवडणूक रंगतदार झाली होती. 


 

Web Title: Sheggaon constituency election results: BJP's Monica Rajale wins; The cover of the nationalist is defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.