Sharan Market : Action taken by Municipal Department | शरण मार्केट जमीनदोस्त : मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई
शरण मार्केट जमीनदोस्त : मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

अहमदनगर : शहरातील तोफखाना येथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. या गाळ्यांवर महापालिकेने सकाळी कारवाई केली. आज महापालिकेने हे गाळे पाडले.
बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे झाली होती. त्यावर सुनावणी होऊन कारवाईचे आदेश देण्यात आले होते. कारवाई होत नसल्याने नगरविकास विभागाच्या सचिवांंकडुन लोकायुक्तांनी अहवाल मागविण्यात आला होता. या कारवाईत सुमारे १०३ गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलिस बंदोबस्तात कारवाई केली.


Web Title: Sharan Market : Action taken by Municipal Department
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.