School of girls in the city taluka! | नगर तालुक्यातील शाळांना मुलींच्या खेळाचे वावडे !
नगर तालुक्यातील शाळांना मुलींच्या खेळाचे वावडे !

ठळक मुद्देशालेय क्रीडा स्पर्धा : ४३ शाळांनी स्पर्धेकडे फिरवली पाठ

योगेश गुंड
केडगाव : एकीकडे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतातील महिला खेळाडू देशासाठी पदकांची कमाई करत असताना नगर तालुक्यातील शाळांना मात्र मुलींच्या खेळाचे वावडे आहे.शालेय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील ६८ पैकी फक्त २५ शाळांनी आपल्या मुलींचे संघ मैदानात उतरवले आहेत.मुलींच्या खेळाबाबत वाढत असलेली अनास्था चिंतेचा विषय बनली आहे.
सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु असून यात भातातातील महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारात दैदीप्यमान कामगिरी करत आहेत.अनेक महिला खेळाडूनी आपल्या देशासाठी पदकांची कमाई करून देशाचे नाव कमावले आहे.यातील अनेक खेळाडू ग्रामीण भागातून पुढे आल्या आहेत.ह्णचक दे इंडियाह्ण आणि ह्यदंगलह्ण सारख्या चित्रपटातून मुलींना खेळण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.मात्र नगर तालुक्यातील शाळा मुलींच्या खेळाबाबत उदासीन असल्याचे दिसून आले आहे.वाडिया पार्क मैदानावर नुकत्याच नगर तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धांचा पहिला टप्पा पार पडला.तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक अस्या एकूण ६८ शाळा आहेत.स्पर्धेत ६८ संघ सहभागी होणे अपेक्षित होते. १४ वषार्खालील व १७ वषार्खालील मुला-मुलींचे कब्बडी सामने पार पडले.यात मुलांच्या सामन्यासाठी ४५ शाळा तर मुलींच्या सामन्यासाठी फक्त २५ शाळांनी सहभाग घेतला.६८ पैकी ४३ शाळांनी मुलींच्या सामन्याकडे पाठ फिरवल्याने या शाळा मुलींच्या खेळाबाबत उदासीन असल्याचे दिसून आले आहे.
तालुका क्रीडा समिती व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धांचा एक टप्पा नुकताच पार पडला.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने सर्व शाळांना पत्र देण्यात आले.काही शाळांनी प्रवेशिका भरून कार्यालयात जमा केले.मात्र स्पर्धेच्या वेळी मैदानात या शाळा उतरल्याच नाहीत.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शैक्षणिक वर्षात मान्यताप्राप्त शाळांना शालेय क्रीडा स्पर्धेत किमान दोन सांघिक व तीन वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभागी होणे बंधनकारक करण्यात आले असूनही अनेक शाळा याचे पालन करताना दिसून येत नाहीत.मुलांच्या स्पर्धांसाठी शाळा जश्या उत्सुक असतात तश्या त्या मुलींच्या स्पर्धांबाबत मात्र उत्सुक दिसत नसल्याचे नगर तालुक्यातील क्रीडा सामन्यात दिसून आले आहे.तालुक्यात अजून हॉलीबॉल,खो-खो,कुस्ती यासारख्या क्रीडा प्रकारातील सामने राहिले आहेत.मात्र मुलींच्या संघाचा सहभाग कमी असल्याने आयोजकानी ही नाराजी व्यक्त केली आहे.

नगर तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धांचा पहिला टप्पा पूर्ण झाला.यात मुलींच्या संघाचे प्रमाण कमी होते.आम्ही सर्व शाळांना स्पर्धेत सहभागी होण्याबाबत पत्र दिले होते.मात्र मुलींच्या सामन्याच्या वेळी अनेक शाळांनी मैदानात उतरण्याचे टाळले. - महेंद्र हिंगे, अध्यक्ष,नगर तालुका क्रीडा समिती

 

Web Title: School of girls in the city taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.