प्रेमातून फुलली समाजसेवेची ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 04:51 PM2020-02-14T16:51:01+5:302020-02-14T16:51:30+5:30

आधी कॉलेजमध्ये एकत्र शिकणारे डॉ. दिलीप आणि सुचेता यांचे न कळत एकमेकांवर प्रेम जडले. मनातलं प्रेम त्यांच्या शिक्षणाच्या आड आलं नाही. शिक्षण पूर्ण होताच हे प्रेम विवाहबंधनात अडकलं आणि कायमचं नात झालं.

'Sanjeevani' of social service full of love | प्रेमातून फुलली समाजसेवेची ‘संजीवनी’

प्रेमातून फुलली समाजसेवेची ‘संजीवनी’

Next

व्हॅलेंटाईन-डे स्पेशल /भाऊसाहेब येवले /
आधी कॉलेजमध्ये एकत्र शिकणारे डॉ. दिलीप आणि सुचेता यांचे न कळत एकमेकांवर प्रेम जडले. मनातलं प्रेम त्यांच्या शिक्षणाच्या आड आलं नाही. शिक्षण पूर्ण होताच हे प्रेम विवाहबंधनात अडकलं आणि कायमचं नात झालं. नात्यांच्या या संजीवनीला समाजसेवेचा वसा लाभला आहे. ही कथा आहे राहुरी येथील डॉ. दिलीप कुलकर्णी व सुचेता कुलकर्णी यांची.
संजीवनी हॉस्पिटल म्हटले की डॉ़ दिलीप कुलकर्णी व सुचेता कुलकर्णी यांचे नाव ओघाने डोळ््यासमोर येते़ दोघांचाही मूळ पिंड समाजसेवेचा. सुचेता यशवंत कुलकर्णी या सातारा येथे सायन्स कॉलेजला दुस-या वर्षाला होत्या. भाऊ संजय यांच्याकडे मित्र म्हणून डॉ़ दिलीप कुलकर्णी हे येत असत. त्यामुळे कॉलेज जीवनापासून दोघांची ओळख होती.
शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्नाचा विषय दोघांच्याही मनात नव्हता. सुचेता या एमएसस्सीनंतर सांगली येथील विलींग्डन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. डॉ़ कुलकर्णी हे राहुरी येथील नगर परिषदेच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय आधिकारी म्हणून रूजू झाले. लग्नापूर्वी ओळख असल्याने दोघांनाही एकमेकांचा स्वभाव माहित होता. सुचेता या हट्टी स्वभावाच्या होत्या. सोने, कपडे खरेदी करणे यापेक्षा त्यांना वाचन, संगीत याची आवड होती. पुस्तक वाचण्याचे ठरविले तर रात्रीतून वाचून काढीत असत. लग्नानंतर स्वत:चे हॉस्पिटल असावे असे कुलकर्णी दाम्पत्याला वाटत होते. त्यानुसार राहुरी येथे संजीवनी हॉस्पिटलची उभारणी केली. डॉक्टरांचा स्वभाव हसतमुख व आनंदाने वैद्यकीय व्यवसाय करणे असा आहे. सुचेता यांना नवीन विषय शिकण्याची आवड आहे. संकट आले तर त्यावर मात करीत एकमेकांसह कुटुंबाला सावरून घेण्याचे कसब कुलकर्णी दाम्पत्यामध्ये आहे. मुलगा डॉ़ ऋषिकेश यांच्यावर चांगले संस्कार करण्यात आले. सून डॉ़ स्नेहा ही देखील डॉक्टर आहे. दोघेही पुणे येथे वैद्यकीय व्यवसाय यशस्वीपणे करीत आहे. सुचेता व दिलीप कुलकर्णी या दोघांचाही स्वभाव सारखाच आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात भांडणाचे प्रसंग आले नाही.  वर्षभर आनंदी राहत आलेले काम करीत राहणे यालाच व्हॅलेंटाईन डे असे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे.

Web Title: 'Sanjeevani' of social service full of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.