अहमदनगरच्या पर्यटन विकासाबाबत शासनाला आराखडा देणार- संग्राम जगताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:32 PM2020-10-11T12:32:14+5:302020-10-11T12:34:04+5:30

अहमदनगर : नगर शहराच्या पर्यटन विकासाबाबत नागरिकांसोबत चर्चा करुन शासनाला सर्वांगीण आराखडा सादर केला जाणार आहे. पुढील काळात हरित नगर व पर्यटनासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

Sangram Jagtap will give a plan to the government regarding the tourism development of the city | अहमदनगरच्या पर्यटन विकासाबाबत शासनाला आराखडा देणार- संग्राम जगताप 

अहमदनगरच्या पर्यटन विकासाबाबत शासनाला आराखडा देणार- संग्राम जगताप 

googlenewsNext

अहमदनगर : नगर शहराच्या पर्यटन विकासाबाबत नागरिकांसोबत चर्चा करुन शासनाला सर्वांगीण आराखडा सादर केला जाणार आहे. पुढील काळात हरित नगर व पर्यटनासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

नगरच्या पर्यटन विकासाबाबत जगताप यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे. या निधीसाठी शासनाकडे आराखडा सादर करावयाचा आहे. हा आराखडा सादर करण्यासाठी जगताप व रसिक ग्रुपचे संस्थापक जयंत येलूलकर यांच्या पुढाकारातून शनिवारी निमंत्रित व्यक्तींची एक बैठक बोलविण्यात आली होती. 


या बैठकीत अवतार मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर, प्रकाश छजलानी, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे, महेंद्र कुलकर्णी, आदेश चंगेडिया, गौतम मुनोत, रफिक मुन्शी, प्रियदर्शन बंडेलू, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष सलीम शेख, मेहेर तिवारी, स्वप्नील मुनोत, सीताराम काकडे, विशाल लाहोटी, नगरसेवक गणेश भोसले, श्रीनिवास बोज्जा, नगर रायझिंगचे संदीप जोशी, पुष्कर तांबोळी आदींनी नगरच्या पर्यटन विकासाबाबत विविध सूचना   मांडल्या.  जगताप म्हणाले, नगर शहर कचराकुंडीमुक्तीकडे वाटचाल करत आहे. स्वच्छतेतही आपण चांगली प्रगती करत आहोत.

आपण विधानसभेत प्रश्न मांडल्यानंतर सीनानदी अतिक्रमण मुक्त होत आहे. पर्यटन विकास होण्यासाठी आता सरकारकडे आराखडा सादर केला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांची मते विचारात घेणार आहोत. पर्यटन व सांस्कृतिकदृष्ट्या शहर संपन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रारंभी येलूलकर यांनी बैठकीमागील हेतू विशद केला. माणिक विधाते, अण्णाशेठ मुनोत, भूषण देशमुख, संजय चोपडा, श्रीकांत मांढरे, रमेश जंगले, सुदर्शन कुलकर्णी, ऋषीकेश येलूलकर यांची उपस्थित होती. 


मान्यवरांनी सूचविले  विविध प्रकल्प 
पर्यटन विकासासाठी बैठकीत विविध सूचना मांडण्यात आल्या. पर्यटकांना आकर्षितकरण्यासाठी शहरात स्वच्छता बाळगावी. पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत अभियंते, वास्तुविशारद तसेच नागरिकांकडून मते व कल्पना मागवाव्यात. आमदार व खासदार निधीतील काही हिस्सा ठरवून पर्यटन विकासावर खर्च करावा. भुईकोट किल्ला सुशोभित करुन तेथे लेझर शो व उद्यान विकसित व्हावे. शहरातील चौक लोकसहभागातून सुशोभित करावेत. दरवर्षी एक ापर्यटनस्थळावर लक्ष केंद्रित करुन त्याचा सर्वांगीण विकास करावा. सिनेमा व मालिकांच्या चित्रीकरणासाठी नगर शहराजवळ चित्रनगरी निर्माण करावी. पर्यटन विकासाबाबत जगभर असणाºया नगरकरांची मदत घ्यावी, आदी सूचनांचा त्यात समावेश आहे. 

Web Title: Sangram Jagtap will give a plan to the government regarding the tourism development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.