संगमनेर-अकोले असा भेदभाव कधीही केला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:19 AM2021-04-19T04:19:34+5:302021-04-19T04:19:34+5:30

अकोले : संगमनेर- अकोले असा कधीही दुजाभाव केला नाही, करणार नाही अन् होऊही देणार नाही. रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असलेले ...

Sangamner-Akole has never discriminated like this | संगमनेर-अकोले असा भेदभाव कधीही केला नाही

संगमनेर-अकोले असा भेदभाव कधीही केला नाही

Next

अकोले : संगमनेर- अकोले असा कधीही दुजाभाव केला नाही, करणार नाही अन् होऊही देणार नाही. रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असलेले रुग्ण लक्षात घेऊन योग्य वाटप केले गेले आहे, असे स्पष्ट करत, अकोलेत ऑक्सिजन बेडची संख्या वाढविणे गरजेचे असून, त्यात प्राधान्य क्रमाने प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

रविवार सायंकाळी थोरात यांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. तेव्हा कोविडचा आढावा घेत त्यांनी प्रशासनास सूचना केल्या. यावेळी आमदार डाॅ. सुधीर तांबे, आमदार डाॅ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, मधुकर नवले, मीनानाथ पांडे, उपविभागीय अधिकारी डाॅ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने उपस्थित होते.

अकोलेचे दोन- अडीचशे कोरोना रुग्ण संगमनेरमध्ये उपचार घेत आहेत. रेमडेसिविरची गरज ओळखून वाटप होते. अकोलेत कोरोना रुग्ण वाढतात ही चिंतेची बाब आहे. अकोलेत ऑक्सिजन बेड वाढले पाहिजेत. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ. कोविड लस व ऑक्सिजन कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास थोरात यांनी अकोलेकरांना दिला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, अमित भांगरे, जिल्हा बँक संचालक सुरेश गडाख, संपत कानवडे, मंदाबाई नवले, शिवाजी नेहे, सोन्याबापू वाकचौरे, रवी मालुंजकर, रमेश जगताप, बाळासाहेब नाईकवाडी, अरीफ तांबोळी, डाॅ. रवी गोर्डेे, डाॅ. जयसिंग कानवडे, तहसीलदार मुकेश कांबळे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभिरे, डाॅ. बाळासाहेब मेेहेत्रे, डाॅ. श्याम शेटे, पोलीस निरीक्षक अभय परमार उपस्थित होते.

Web Title: Sangamner-Akole has never discriminated like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.