वाळूतस्करांनी वाळूचा ट्रक जामखेड तहसील कार्यालयातून पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 02:17 PM2020-09-23T14:17:40+5:302020-09-23T14:18:18+5:30

जामखेड - प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी कर्जत रस्त्यावर वाळूसह भरलेला ट्रक पकडून तहसील कार्यालयात आणला. त्यानंतर काही वेळाने ...

The sand smugglers snatched the sand truck from the tehsil office | वाळूतस्करांनी वाळूचा ट्रक जामखेड तहसील कार्यालयातून पळवला

वाळूतस्करांनी वाळूचा ट्रक जामखेड तहसील कार्यालयातून पळवला

googlenewsNext

जामखेड - प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी कर्जत रस्त्यावर वाळूसह भरलेला ट्रक पकडून तहसील कार्यालयात आणला. त्यानंतर काही वेळाने वाळूतस्करांनी तो ट्रक तहसील कार्यालयातून पळवला. या घटनेचा महसूल प्रशासनाने निषेध केला असून चार महिन्यांत दुसर्‍यांदा अशी घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे हे पोलीस पथकासोबत कारवाईसाठी बाहेर पडले होते. त्यांना कर्जत रस्त्यावर एक ट्रक वाळू घेऊन येताना दिसला सदर ट्रक थांबवून त्यांनी तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. ट्रक तहसील कार्यालयात आणून लावल्यानंतर काही वेळाने वाळूतस्करांनी गेट तोडून वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून पळवला.

याबाबत नायब तहसीलदार यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना सदर घटनेची माहिती दिली व वाळूतस्करावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

Web Title: The sand smugglers snatched the sand truck from the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.