साई जन्मभूमीचा मुद्दा पेटला; रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:26 PM2020-01-16T22:26:05+5:302020-01-16T22:26:45+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साईभक्त आहेत. त्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्याकडून असा उल्लेख झाला असावा असे शिर्डीकरांना वाटते़

Sai's birthplace issue lit up; Shirdi closed from Sunday | साई जन्मभूमीचा मुद्दा पेटला; रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद

साई जन्मभूमीचा मुद्दा पेटला; रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद

Next

शिर्डी : तथाकथित जन्मभूमीच्या मुद्द्यावर शिर्डी व पंचक्रोशी आक्रमक झाली आहे़ हा मुद्दा निकाली काढण्यासाठी रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी रात्री घेण्यात आला. 


रविवारपासून बेमुदत बंद सुरू होण्यापूर्वी शनिवारी (दि. १८) सायंकाळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे़ शुक्रवारी पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यांनाही या बंदमध्ये सहभागी करून घेण्याचा शिर्डीकरांचा प्रयत्न आहे़ भाविकांचे हाल टाळण्यासाठी दोन दिवस अगोदर निर्णय जाहीर करण्यात आला आहे़ शिर्डीच्या इतिहासात प्रथमच शिर्डी बेमुदत बंद राहणार आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील सार्इंच्या जन्मस्थळासाठी १०० कोटींचा विकास आराखडा राबवला जाईल, अशी घोषणा मागील आठवड्यात केली होती़ त्याचे तीव्र पडसाद शिर्डी व भाविकांमध्ये उमटले आहेत. पाथरीला निधी देण्यास शिर्डीकरांची मुळीच हरकत नाही़ मात्र साई जन्मस्थान म्हणून त्याची ओळख निर्माण केली जाते याला शिर्डीकरांचा आक्षेप आहे़ जन्मस्थळाच्या वादामुळे बाबांच्या मूळ शिकवणुकीला व प्रतिमेलाच धक्का पोहचणार असल्याने शिर्डीकरांचा जन्मस्थानाच्या दाव्याला आक्षेप आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साईभक्त आहेत. त्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्याकडून असा उल्लेख झाला असावा असे शिर्डीकरांना वाटते़ त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगण्याचाही ग्रामस्थांचा प्रयत्न आहे़ यापूर्वीही राष्ट्रपतींनी साई समाधी शताब्दीत जन्मस्थळाचा उल्लेख केला होता़ त्यावर शिर्डीकरांनी थेट दिल्लीत जाऊन वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली होती़ या बैठकीला नगराध्यक्षा अर्चना कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, शिवाजी गोंदकर, अभय शेळके, विजय कोते, सुधाकर शिंदे, नितीन उत्तम कोते, रविंद्र गोंदकर, सुजित गोंदकर, रमेश गोंदकर, दीपक वारूळे, गजानन शेर्वेकर,तुकाराम गोंदकर, सुनील वारूळे, गणेश कोते, गणीभाई पठाण, जमादार इनामदार, तान्हाजी गोंदकर, सुरेश मुळे आदींची उपस्थिती होती़

Web Title: Sai's birthplace issue lit up; Shirdi closed from Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.