हरिश्चंद्र गडावर आढळली अतिप्राचीन कुळातील पाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 08:51 AM2021-06-19T08:51:09+5:302021-06-19T08:51:37+5:30

‘निमॅस्पीस’ कुळातील ‘ड्राॅफ गेको’ असे तिचे नाव आहे. 

The sails of the most ancient clan were found on the Harishchandra fort | हरिश्चंद्र गडावर आढळली अतिप्राचीन कुळातील पाल

हरिश्चंद्र गडावर आढळली अतिप्राचीन कुळातील पाल

Next

- मच्छिंद्र देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
कोतूळ (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड-कळसुबाई अभयारण्यात ‘निमॅस्पीस’ कुळातील ‘ड्राॅफ गेको’ नावाची अतिप्राचीन पाल सापडली. त्या पालीस हरिश्चंद्रगड ड्राॅफ गेको असे नावे देण्यात आले आहे.

 आतापर्यंत या कुळातील ५० पालींचा शोध लागला आहे. या पालींचे म्हैसूरचे पठार, अंदमान निकोबार येथेही अस्तित्व आहे.
इतर पाली उभ्या बुबुळाच्या निशाचर आहेत तर निमॅस्पीस किंवा ड्राॅफ गेको गोल बुबुळाच्या दिनचर आहेत. त्यांचे खाद्य सामान्य कीटक आहे. महाराष्ट्रात या निमॅस्पीस कुळातील पालीचे अस्तित्व हरिश्चंद्रगड परिसरात आढल्याने तिला ११ मे रोजीच्या सुटॅक्सा नावाच्या जागतिक संशोधन पत्रिकेत हरिश्चंद्रगड 
ड्राॅफ गेको असे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे, इशान अग्रवाल, अक्षय खांडेकर यांनी हे संशोधन केले.

गत वर्षी तेजस ठाकरे यांनी खेकडे व पाली संदर्भात संशोधन करण्यास परवानगी मागितली होती. त्यांचे हे संशोधन हरिश्चंद्रगडाचे नाव जागतिक पातळीवर नेईल.    
    -डी डी पडवळे 
    वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी, 
    हरिश्चंद्रगड अभयारण्य

पश्चिम घाट जैवविविधतेने खच्चून भरलेला आहे. संशोधन झालेली पाल प्रादेशिक अतिप्राचीन अधिवासाचे प्रतीक आहे.    -डाॅ. व्ही. बी. गिरी, 
    जागतिक दर्जाचे जैव संशोधक

Web Title: The sails of the most ancient clan were found on the Harishchandra fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.