परळीत माझं काही खरं नाही ही अफवा-पंकजा मुंडे; पाथर्डीत राजळेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:02 PM2019-10-17T18:02:36+5:302019-10-17T18:02:53+5:30

परळीमध्ये माझं काही खरं नाही ही अफवा आहे. पंतप्रधान मोदींना प्रचारासाठी यावे लागले, असे आमचे विरोधक म्हणतात. स्व.मुंडेंसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी, राजनाथसिंह आले होते. आता माझ्या प्रचारासाठी मोदी आले आहेत. त्यात वावगे काय? असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

Rumor-it-pankaja Munde that I had nothing in Perl; Meetings for promotion of schools in Pathardi | परळीत माझं काही खरं नाही ही अफवा-पंकजा मुंडे; पाथर्डीत राजळेंच्या प्रचारार्थ सभा

परळीत माझं काही खरं नाही ही अफवा-पंकजा मुंडे; पाथर्डीत राजळेंच्या प्रचारार्थ सभा

Next

पाथर्डी : परळीमध्ये माझं काही खरं नाही ही अफवा आहे. पंतप्रधान मोदींना प्रचारासाठी यावे लागले, असे आमचे विरोधक म्हणतात. स्व.मुंडेंसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी, राजनाथसिंह आले होते. आता माझ्या प्रचारासाठी मोदी आले आहेत. त्यात वावगे काय? असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला.
पाथर्डी येथील तिलोक जैन विद्यालयाच्या मैदानावरील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, माजी खासदार दिलीप गांधी, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट, पांडुरंग खेडकर, सोमनाथ खेडकर, सभापती चंद्रकला खेडकर, भिमराव फुंदे, मोहनराव पालवे, दिनेश लव्हाट, अरूण मुंडे, तुषार वैद्य, नितीन काकडे आदी व्यासपीठावर होते.
मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादी व कॉँग्रेसचा गलथान कारभार जनतेने पाहिला आहे. त्यांनी केवळ जातीपातीचे राजकारण केले. त्यांना विकासाचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे त्यांच्या मागे जाऊ नका. ते बुडते जहाज आहे, असा टोला त्यांनी लगावला. 
मुंडे म्हणाल्या, परळी माझी आई आहे, तर पाथर्डी माझी मावशी आहे. पाथर्डीकरांनी माझ्यावर अमाप प्रेम केले आहे. इतके प्रेम कोणाला मिळते. आईपेक्षा मावशीची माया जास्त आहे, हे इथे जमलेल्या गर्दीवरून दिसत आहे. कितीही त्रास झाला व संघर्ष झाला तरी माझे आणि पाथर्डीचे एक विश्वासाचे नाते आहे. आमदार राजळे यांना मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध करून दिला. येणाºया निवडणुकीत भाजपचे सरकार येणार आहे. देशात व राज्यात भाजपचेच सरकार, खासदार भाजपचा मग आमदार दुसरा कशाला? त्यामुळे राजळे यांच्या मागे ताकद उभी करा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष केकाण, तर माणिकराव खेडकर यांनी आभार मानले.
पंकजा मुंडे सीएमच्या घोषणा...
किती मताधिक्क्याने तुम्ही मोनिका राजळे यांना विजयी करणार असा प्रश्न मुंडे यांनी केला असता काहींनी पंकजा मुंडे सीएम.. अशा घोषणा दिल्या.

Web Title: Rumor-it-pankaja Munde that I had nothing in Perl; Meetings for promotion of schools in Pathardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.