कीर्तनातून समाजप्रबोधन करणारी ‘क्रांती’ !

By अनिल लगड | Published: May 28, 2020 05:49 PM2020-05-28T17:49:45+5:302020-05-28T17:50:54+5:30

सालेवडगाव (ता.आष्टी, जि.बीड) येथील कीर्तनकार कुमारीका क्रांती सोनवणे हिने आठवीपासून आळंदीत अध्यात्मिक शिक्षण घेतले. ती सध्या संत, महात्म्यायाशिवाय देशभक्ती, एकात्मता, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, साधूसंताची, आई-वडिलांची सेवा, गोमातेची सेवा याविषयी ती प्रबोधन करीत आहे. यामुळे ती महिला कीर्तनकार म्हणून नावारुपाला येत आहे. 

'Revolution' that enlightens the society through kirtan! | कीर्तनातून समाजप्रबोधन करणारी ‘क्रांती’ !

कीर्तनातून समाजप्रबोधन करणारी ‘क्रांती’ !

Next

अध्यात्म / अनिल लगड / 

भारतात ऐतिहासीक, धार्मिक परंपरा पूर्वीपासून चालत आहे. अनेक संत, महात्म्ये आपल्या देशात निर्माण होऊन गेले. त्यांच्या विचारांचा वारसा आजही अनेक जण पुढे नेत आहेत. यात अध्यात्मिक क्षेत्र आघाडीवर आहे. यातून अनेक समाजप्रबोधनकार, कीर्तनकार, प्रवचनकार संत विचारांचा वारसा पुढे नेत आहेत. या संत विचारांचा प्रसार,  प्रचार  देशातील तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळे, गावोगावचे सप्ताह, उरूस, यात्रा उत्सवांमधून कीर्तनकार, प्रवचनकार करतात. यात महिला देखील मागे राहिल्या नाहीत. आता ग्रामीण भागातूनही अनेक कुमारीका मुलींपासून महिला देखील या क्षेत्रात पुढे आल्या आहेत.

 बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सालेवडगाव हे नगर-बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले छोटेसे खेडेगाव. या खेडेगावातील क्रांती नानासाहेब सोनवणे ही अध्यात्मिक शिक्षक घेऊन कीर्तन, प्रवचन करीत आहे. क्रांती हिचा जन्म १४ एप्रिल २००० रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. क्रांती ही चार वर्षाची असताना २००४ मध्ये महाराष्टÑात मोठा दुष्काळ पडला होता. पिण्यासाठी पाणी नसल्याने क्रांतीच्या वडिलांना जनावरे घेऊन आष्टी येथे छावणीत जावे लागले. सोबत आई पण होती. त्यांचा मुक्काम आष्टीच्या छावणीत असे. परंतु तेथे आईचे वडील तिचे आजोबा तुकाराम खंडू पवार हे आष्टीतच रहात होते. क्रांती हिचे आजोबा कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. ते कम्य्ुनिस्ट विचारांचे होते. क्रांतीला तिची आई आष्टीतच आजोबांकडे घेऊन रहात. आई पण वडिलांना मदत करायला छावणीत जात असे. घरात क्रांती लहान असताना रांगत रांगत घरातील देवघरातील सर्व देव गोळा करीत. घरातच ती देवांचा खेळ ती मांडत असे तिचे वडील सांगतात. परंतु आष्टी येथे आल्यानंतर तिला मात्र नवेनवे वाटू लागले. परंतु तिचा नाविलाज होता. आष्टी येथे आजोबा रहात असलेल्या गल्लीतील महिला, मुली दत्त मंदिरात जात. क्रांतीला लहानपणापासून खेळातच देवांचे धडे मिळाले. यामुळे तिला देवदेवताचे आकर्षण वाटे. महिला दत्त मंदिरात जाताना तिला चल मंदिरात... असे खुणावत. परंतु माझे आजोबा कम्युनिस्ट विचारांचे असल्याने ते देवाला मानत नसत. या महिलांच्या मागे ती लागायची मला आजोबा रागायचे. मग क्रांती रडायची. क्रांती रडली की आजोबा मंदिरात जायला परवानगी देत. 

    मग हळू हळू क्रांती आष्टीच्या गावातील दत्त मंदिरात जाऊ लागली. मला देवाची आवड निर्माण झाली. तेथे आरती, पूजापाठ असा नित्यक्रम रोज सुरू झाला. दिगंबरा..दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा...या जयघोषात पूजा, आरतीला ती जात. तिचे सातवीपर्यंत तिचे शिक्षणआष्टीतच झाले. सहावीत असताना आजोबा वारले. तिला मंदिरात भजन गायची आवड निर्माण झाली. ती भजन देखील म्हणू लागली. शाळेत देखील जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी यांचे पोवाडे  गाऊ लागली. तसे माझे वडील शिक्षित होते.  त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले. आष्टीहून उन्हाळ्याच्या सुटीत गावी आले की, तेथे गुरुवर्य शामसुंदर महाराज पुरी यांच्याकडे आम्ही जात. त्यांनीही वडिलांकडे तिला आळंदीला पाठविण्याचा आग्रह  केला. यासाठी रामकृष्ण कृष्ण हरी अनंतराव दिघे महाराज यांचीही प्रेरणा मिळाली.   

  अध्यात्माची आवड पाहता वडिलांनी मला आठवीत असताना आळंदी (जि. पुणे) येथील श्री संत भगवान बाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत टाकले. संस्थेतील आमच्या गुरूवर्य सुनीताताई महाराज आंधळे यांनी आम्हाला अध्यात्माचे धडे द्यायला सुरूवात केली. संस्था नवीन असल्याने तेथे अजून सुविधा उपलब्ध नव्हत्या. तेथे चार वाजता सर्वांना स्वत:च काम करावे लागे. अनेक अडचणी होत्या. पहिल्या दिवस संस्थेत कसातरी काढला. नंतर अनेक मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला. आमची संस्था इंद्रायणी नदीच्या काठावर होती. पावसाळ्यात एके  दिवशी इंद्रायणीला मोठा पूर आला. आम्ही सर्व झोपेत होते. रात्री पाऊस झाल्याने इंद्रायणीला पूर आल्याने पाणी संस्थेत शिरले. आमचे सर्व सामान वाहून गेले. जे राहिले ते सर्व भिजले. आम्ही अनेक मुलींनी पेट्या बाजूला करुन माउलींचा धावा करुन रात्र जागून काढली. त्यानंतर गुरुवर्य आंधळे महाराज यांनी आम्हाला अध्यात्माबरोबरच खडतर मार्गातून कसा मार्ग काढायचा याचेही धडे दिले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीतेचा कसून अभ्यासाचे धडे दिले. अनेक संत, महात्त्म्याच्या चरित्र वाचन शिकविले. त्यातून आम्ही तेथे भजन, कीर्तनाचे धडे घेतले, असे क्रांती सांगते. 

दोन, तीन वर्षे आळंदीत शिक्षण घेतल्यानंतर क्रांती गावाकडे परतली. आई, वडीलही गावी आले होते. पाऊस, पाणी चांगले असल्याने वडिलांनी डाळिंबाची बाग लावली. त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. नगरच्या राधाबाई काळे महाविद्यालयात ११ वी, १२ वी शिक्षण घेतले. त्यानंतर डीएमएलटीचा कोर्स केला. आता देऊळगाव घाट येथील धस महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या व्दितीय वर्षात शिक्षण घेत आहे. हे करीत असताना गेल्या दोन, तीन वर्षापासून अनेक ठिकाणी कीर्तन करीत आहे. आतापर्यंत विविध गावातील सप्ताहात सुमारे २५० कीर्तन केले आहे. सध्या क्रांती संत, महात्म्ययाशिवाय देशभक्ती, एकात्मता, व्यसनमुक्ती, स्त्रभ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, साधूसंताची, आई-वडिलांची सेवा, गोमातेची सेवा याविषयी ती प्रबोधन करीत आहे. सध्या क्रांती हिच्या कीर्तन, प्रवचनाला मोठी मागणी आहे. यामुळे भविष्यात क्रांती ही निश्चितच राष्टÑीय कीर्तनकार म्हणून नावारुपाला येईल, यात शंका नाही. 

 

Web Title: 'Revolution' that enlightens the society through kirtan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.